कल्याण-डोंबिवलीत खड्डे भरण्यासाठी १३.९० कोटींचे कंत्राट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 05:51 PM2018-07-11T17:51:17+5:302018-07-11T17:52:57+5:30
शहरातील रस्ते जूनमध्ये झालेल्या पावसात वाहुन गेल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या महापालिकेत खड्डे बुजवण्यासाठी खडी-मातीचा भराव टाकण्यासह पावसाने उघडीप घेतल्यावर आवश्यकतेनूसार डांबरीकरण करण्यासाठी १३.९० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे.
डोंबिवली: शहरातील रस्ते जूनमध्ये झालेल्या पावसात वाहुन गेल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या महापालिकेत खड्डे बुजवण्यासाठी खडी-मातीचा भराव टाकण्यासह पावसाने उघडीप घेतल्यावर आवश्यकतेनूसार डांबरीकरण करण्यासाठी १३.९० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे.
त्यापैकी डोंबिवलीसाठी ६ कोटी ९० लाखांची तरतूद असल्याची माहिती डोंबिवली विभागीय अभियंता प्रशांत भुजबळ यांनी दिली. त्यामध्ये शहरातील ह, फ, ग, आय आणि जे असे पाच प्रभाग मिळून काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. हे कंत्राट मार्च महिन्या दरम्यान येणे अपेक्षित होते परंतू प्रतिसादाआभावे दोन वेळा रिकॉल करावे लागले तसेच त्यानंतर पालघर आणि कोकण पदवीधर मतदार संघ आदींच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागली. त्यामुळे खड्डे भरण्यासह अन्य कामाना वेळ लागल्याचे ते म्हणाले.
आता आय प्रभागासह ह प्रभागात त्या कामासाठी दोन एजन्सी काम करत असून ग फ व जे मध्ये प्रत्येकी एक एजन्सी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. त्या कामांवर संबंधित ठिकाणचे उपअभियंता लक्ष देत असल्याचे ते म्हणाले. पावसाच्या दिवसांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्डे पडतात ते भरण्यासाठी खडी-चिकणमाती टाकुन भरण्याचे काम सर्वत्र सुरु आहे, पण पावसाचा जोर बघून कामे करावी लागत असून पावसाच्या संततधारीमुळे चार-पाच दिवस कामावर परिणाम झाला आहे. आता आगामी काळात उघडीप मिळाल्यावर खड्डे बुजवण्याच्या कामाला जोर लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.