फेब्रुवारीमध्ये होणार कोकण इतिहास परिषदेचे १३ वे राष्ट्रीय अधिवेशन

By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 23, 2023 04:34 PM2023-12-23T16:34:30+5:302023-12-23T16:34:59+5:30

इतिहास संशोधक डॉ. विजय धारुरकर हे अधिवेशनाचे अध्यक्ष.

13th National Convention of Konkan History Council in February | फेब्रुवारीमध्ये होणार कोकण इतिहास परिषदेचे १३ वे राष्ट्रीय अधिवेशन

फेब्रुवारीमध्ये होणार कोकण इतिहास परिषदेचे १३ वे राष्ट्रीय अधिवेशन

प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : कोकण इतिहास परिषदेचे १३ वे राष्ट्रीय अधिवेशन रविवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८-३० ते संध्याकाळी ५-३० पर्यंत कणकवली कॉलेज, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत इतिहास संशोधक डॉ. विजय ल. धारुरकर हे आहेत, तर प्रमुख पाहुणे मुंबई विद्यापीठ अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायण भोसले भूषविणार आहेत अशी माहिती ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ सदाशिव टेटविलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

या परिषदेत कोकणातील आदिम ते आधुनिक नगर संस्कृतिचा इतिहास या विषयावर अनेक मान्यवर आपापले शोध निबंध सादर करणार आहेत. यावर्षीचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ इतिहास अभ्यासक, चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संस्थचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या वर्षात प्रसिध्द झालेल्या कोकणावरील संशोधन ग्रंथास पुरस्कार देण्यात येतो. शिवाय मागील वर्षाच्या उत्कृष्ट शोधनिबंधाला पुरस्कार, महाविद्यालयाने आयोजित केलेल्या मोडीलिपी हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, किल्ले स्पर्धाना परिषद रोख रक्कम आणि मानपत्र देऊन गौरव करते. 

१२ व्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर झालेल्या शोध निबंध पुस्तकाचे व कोकण इतिहास पत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदालन याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते होणार आहे.

Web Title: 13th National Convention of Konkan History Council in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.