१४ नगरसेवकांना अटक व सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 05:35 AM2017-08-10T05:35:31+5:302017-08-10T05:35:31+5:30
विकासकामे होत नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त पी. वेलारासू यांच्या दालनात धिंगाणा घालून त्यांची खुर्ची टेबलावर आपटली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
कल्याण : विकासकामे होत नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त पी. वेलारासू यांच्या दालनात धिंगाणा घालून त्यांची खुर्ची टेबलावर आपटली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील १४ नगरसेवकांना बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलीस ठाण्यात त्यांना लाइक (टेबल) जामीन देत त्यांची मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणातील अन्य १३ सदस्यांची अटक बाकी आहे. पोलिसांकडून त्यांनाही लवकरच अटक केली जाणार आहे. त्यांच्या विषयातही प्रक्रिया करून त्यांना जामीन मिळणार आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांना जामीन मिळाला आहे. गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी प्रत्येक नगरसेवकाला समन्स पाठवून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. त्यांचा जबाब घेतला होता.
प्रशासनाने तक्रार दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगरसेवकांनी हा प्रकार केल्याने आता कोणताही प्रश्न घेऊन येणाºया नगरसेवकाला थेट प्रशासकीय इमारतीत प्रवेश नाकारला जातो. त्याचाच फटका पाणीप्रश्नावर आयुक्तांच्या कार्यालयाकडे धाव घेणाºया सत्ताधारी भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे व प्रभाग समिती सभापती सोनी अहिरे यांना मंगळवारी बसला होता. त्यासाठी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांना स्वत: येऊन शिष्टाई करावी लागली होती.