१४ कि.मी. सागरी अंतर कापून श्रावणी जाधवची कोरोनायोद्धा यांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:00 AM2021-02-23T05:00:11+5:302021-02-23T05:00:11+5:30
ठाणे : कोरोनाकाळात कोरोनायोद्धा यांनी केलेल्या कार्याचा गौरव, त्यांचा सन्मान करण्यासाठी कल्याणमधील ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची जलतरणपटू श्रावणी जाधव ...
ठाणे : कोरोनाकाळात कोरोनायोद्धा यांनी केलेल्या कार्याचा गौरव, त्यांचा सन्मान करण्यासाठी कल्याणमधील ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची जलतरणपटू श्रावणी जाधव (१४) हिने रविवारी एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ कि.मी.चे सागरी अंतर पार करून कोरोनायोद्धा यांना मानवंदना दिली.
कोरोनाकाळात डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, स्मशानभूमीतील कर्मचारी, साफसफाई कर्मचारी, शासकीय सेवेतील सर्वच कर्मचारी आणि अधिकारी यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक शब्दाने करता न येण्यासारखे आहे. त्यामुळेच त्यांचा सन्मान करण्यासाठी श्रावणी हिने रविवारी एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ कि.मी.चे सागरी अंतर कापण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार, तिने हे अंतर तीन तास ४३ मिनिटांत पोहून पार केले. ती ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची जलतरणपटू असून तिच्या या उपक्रमास स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह स्थायी समिती सदस्या सुजाता सानप आणि स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे किशोर शेट्टी व संतोष पाटील यांनीदेखील तिला शुभेच्छा देऊन तिच्या कामाचे कौतुक केले.
---------
फोटो : २२ ठाणे श्रावणी जाधव