ठाण्यात अवघ्या १४ वर्षीय मुलाने चोरली मोटारसायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 10:47 PM2019-10-10T22:47:01+5:302019-10-10T23:00:39+5:30
मोटारसायकल फिरविण्याच्या हौसेपोटी अवघ्या १४ वर्षीय मुलाने त्याच्याच मालकाची मोटारसायकल चोरल्याचा प्रकार उघड झाला आहे. खब-यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतने असून त्याची रवानगी आता बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नौपाडा परिसरातून मोटारसायकलचोरी करणा-या एका चौदावर्षीय मुलाला नौपाडा पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. त्याला भिवंडीतील बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश भिवंडीच्या बालन्यायालयाने दिले आहेत.
भास्कर कॉलनी, नौपाडा येथून ७ आॅक्टोबर २०१९ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास एक मोटारसायकल चोरीस गेली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार सुनील अहिरे, पोलीस नाईक संजय चव्हाण, सुनील राठोड, बाळासाहेब पाटील आणि पोलीस शिपाई गोरख राठोड यांनी खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गस्तीदरम्यान या अल्पवयीन मुलाला ९ आॅक्टोबर रोजी पकडले. वाहनांची सफाई करणाºयाची तो छोटीमोठी कामे करीत होता. त्याच मालकाची त्याने मोटारसायकल चोरली होती. केवळ हौस म्हणून मोटारसायकल फिरविली. मात्र, पेट्रोल संपल्यानंतर ती एका ठिकाणी उभी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. चोरीतील ७० हजारांची विनाक्रमांकाची मोटारसायकलही या पथकाने त्याच्या ताब्यातून हस्तगत केली आहे. त्याची भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी केली आहे.