ठाणे जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे १४०८ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:05 AM2020-08-21T04:05:18+5:302020-08-21T04:05:37+5:30

कल्याण-डोंबिवली परिसरात ३२९ रुग्णांची वाढ झाली असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत २५ हजार ५६० रुग्ण बाधित झाले आहेत.

1408 patients of corona in Thane district on Thursday | ठाणे जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे १४०८ रुग्ण

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे १४०८ रुग्ण

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ४०८ रुग्णांची गुरुवारी वाढ झाली. यामुळे जिह्यातील रुग्णसंख्या आता एक लाख ११ हजार २५९ झाली आहे. तर, ३६ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या तीन हजार १७८ झाली.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे १७० रुग्ण आढळल्यामुळे शहरात २४ हजार १३ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली. याशिवाय, सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आजपर्यंत ७७० जणांच्या मृत्यूची नोंद ठाणे शहर परिसरात झाली. याप्रमाणेच कल्याण-डोंबिवली परिसरात ३२९ रुग्णांची वाढ झाली असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत २५ हजार ५६० रुग्ण बाधित झाले आहेत.
नवी मुंबई महापालिकेत सर्वाधिक ४७७ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. या शहरात आतापर्यंत २२ हजार २७५ बाधितांची, तर मृतांची संख्या ५२५ वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात ३४ रुग्ण आढळले आहेत.
भिवंडी महापालिका क्षेत्रात गुरुवारी २६ रुग्ण नव्याने सापडले आहेत. आता या शहरात चार हजार १० बाधितांची संख्या झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १७१ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दिवसभरात अंबरनाथमध्ये ३९ रुग्णांची वाढ झाली आहे. आता बाधितांची संख्या चार हजार ५८५ झाली. बदलापूरमध्ये ६७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ६७० झाली. त्यामुळे मृत्यूची संख्या ६५ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
>वसई-विरारमध्ये
सहा रुग्णांचा मृत्यू
वसई-विरार शहरात गुरुवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर दिवसभरात १८१ नवीन रुग्ण आढळून आले. दरम्यान, ३१४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले. यामुळे १२ हजार ७४१ रुग्णांनी आजवर कोरोनावर मात केली आहे.
वसई-विरार शहर महापालिका हद्दीत गुरुवारी १८१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असल्याने आता एकूण बाधित रुग्णांची संख्या १५ हजार २२४ वर पोहचली आहे. तर गुरुवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने पालिका हद्दीत आजवर एकूण ३२३ रुग्ण मयत झाले आहेत. त्यासोबत शहरात एकूण २ हजार १६० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
>रायगडमध्ये २४ तासांत ५३५ नवीन रुग्णांची नोंद
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवार २० आॅगस्ट रोजी ५३५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या २२ हजार २०५ पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २१२, पनवेल ग्रामीणमध्ये ५५, उरण १६, खालापूर २४, कर्जत २२,असे ५३५ रुग्ण सापडले आहेत.

Web Title: 1408 patients of corona in Thane district on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.