ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४९० रुग्ण सापडले; ५७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:29 PM2021-05-15T21:29:27+5:302021-05-15T21:29:49+5:30

ठाण्यात कोरोनाचे एकहजार ४९० रुग्ण शनिवारी आढळले असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९९ हजार ४५१ बाधितांची नोंदले गेले असून मृतांची संख्या आठ हजार ४२७ झाली आहे.  

1490 corona patients found in Thane district 57 died | ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४९० रुग्ण सापडले; ५७ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४९० रुग्ण सापडले; ५७ जणांचा मृत्यू

Next

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे एकहजार ४९० रुग्ण शनिवारी आढळले असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९९ हजार ४५१ बाधितांची नोंदले गेले असून मृतांची संख्या आठ हजार ४२७ झाली आहे.  

          ठाणे शहरात ३०६  रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख २६ हजार १८० झाली. शहरात आठ मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ७९८ नोंदवण्यात आली. कल्याण - डोंबिवलीत ४८१रुग्णांची वाढ झाली असून १८ मृत्यू झालै आहे. आता एक लाख २९ हजार ४११ रुग्ण बाधीत असून एक हजार ६६२ मृत्यूची नोंंद झाली आहे. 

            उल्हासनगरला ३८ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू झाले . येथील बाधितांची संख्या १९ हजार ७१६ झाली. तर, ४५७ मृतांची नोंद आहे. भिवंडीला १२ बाधीत असून तीन मृत्यू आहे. आता बाधीत १० हजार २१२ असून मृतांची संख्या ४१७ नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये १६५ रुग्ण आढळले असून नऊ मृत्यू झाले आहेत. या शहरात बाधितांची संख्या ४७ हजार ६५ असून मृतांची संख्या एक हजार १८१ झाली. 

     अंबरनाथमध्ये ४७ रुग्ण आढळल्याने आता बाधीत १८ हजार ७६८ असून चार मृत्यू आहे. येथील मृत्यूची संख्या ३९६ झाली आहे. बदलापूरमध्ये ८७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत २० हजार एक झाले आहेत. या शहरात दोन मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या २३० झाली आहे. ग्रामीणमध्ये १९९ रुग्णांची वाढ झाली असून दहा मृत्यू झाले. आता बाधीत ३१ हजार ८५८ तर आतापर्यंत ७८९ मृत्यू झाले आहेत.
 

Web Title: 1490 corona patients found in Thane district 57 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.