ताबा १५ दिवस, भाडे तीन दिवसांचेच!
By admin | Published: October 15, 2016 06:39 AM2016-10-15T06:39:54+5:302016-10-15T06:39:54+5:30
अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलाचे मैदान गृहप्रकल्प प्रदर्शनाकरिता तीन दिवसांसाठी दिले होते. प्रदर्शन तीन दिवसांचे असले तरी या मैदानाचा ताबा हा सात दिवस आधीच
पंकज पाटील / अंबरनाथ
अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलाचे मैदान गृहप्रकल्प प्रदर्शनाकरिता तीन दिवसांसाठी दिले होते. प्रदर्शन तीन दिवसांचे असले तरी या मैदानाचा ताबा हा सात दिवस आधीच दिला होता, तर प्रदर्शन संपल्यावर पुन्हा पाच दिवस हा ताबा आयोजकांकडे होता. १५ दिवस या मैदानाचा ताबा आयोजकांकडे असतानाही या मैदानाचे केवळ तीन दिवसांचे भाडे आकारले आहे.
७ ते ९ आॅक्टोबरदरम्यान प्रदर्शन भरवले होते. प्रदर्शनासाठी मैदानात वातानुकूलित शामियाना उभारला होता. शामियाना उभारण्यासाठी आयोजकांनी मैदानाचा ताबा १ आॅक्टोबरलाच घेतला होता. प्रदर्शनाच्या सात दिवसांपूर्वीच या ठिकाणी शामियाना उभारण्याचे काम सुरू होते. लोखंडी खांब आणि छत या ठिकाणी उतरवण्यात आले होते. प्रदर्शनानंतर शामियाना काढण्यासाठी पुन्हा पाच दिवस लागले. याचाच अर्थ हे मैदान सलग १ ते १४ आॅक्टोबरपर्यंत आयोजकांकडे सोपवले होते. प्रदर्शन तीन दिवसांचे असले तरी त्याच्या तयारीसाठी १५ दिवस जाणार, याची कल्पना आयोजकांना आणि क्रीडा अधिकाऱ्यांना होती. (प्रतिनिधी)