तीन कोटी खर्चून मुरबाडच्या १५ ग्रामपंचायती होणार चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:41 AM2021-04-04T04:41:59+5:302021-04-04T04:41:59+5:30

ठाणे : येथील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायती व स्मशानभूमींसाठी ३१ कोटी ६३ लाखांची घोषणा करतानाच ...

15 gram panchayats of Murbad will be made shiny at a cost of Rs 3 crore | तीन कोटी खर्चून मुरबाडच्या १५ ग्रामपंचायती होणार चकाचक

तीन कोटी खर्चून मुरबाडच्या १५ ग्रामपंचायती होणार चकाचक

Next

ठाणे : येथील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायती व स्मशानभूमींसाठी ३१ कोटी ६३ लाखांची घोषणा करतानाच स्वत:च्या तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींनादेखील तीन कोटी खर्च करून चकाचक करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी संबंधित गावक-यांकडून सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींप्रमाणेच मुरबाड तालुक्यातील नढई, खोपिवली, महाज, खेडले, न्याहाडी, शेलगाव, वाल्हीवरे, वैशाखरे, शेलारी, कोलठण, डेहनोली, भोरांडे, तळवली, मोरोशी, आजिवले आदी १५ गावांतील ग्रामपंचायतींना सुसज्ज कार्यालय उभारण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

याप्रमाणेच तालुक्यातील कान्हार्ले, वांजळे, कोंडेसाखरे, शिरगाव, एकलहरे, टेंभरे बु, उमरोली बु. रामपूर, करवेळे, गवाळी, शिरवली, भालुक, देहरी, आंबेगाव, भादाने, सोनगाव, कळमखांडे, सासणे, दहिगाव शे, मोहोप, कळंभे आदी गावांच्या ग्रामपंचायतींच्या कार्यालयाची पुनर्बांधणी-विस्तारीकरण, माल्हेड ग्रामपंचायतीचे सुशोभीकरण, खांदारे गावात दफनभूमी, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे.

तर पवाळे, शिरगाव, खांडपे, खेडले, सासणे, सरळगाव, पाटगाव, बाटलीवाडी येथे आरसीसी स्मशानभूमी, पारतळे, फणसोली, चिखले येथे स्मशानभूमी आणि सायले, बुरसुंगे, जडई, मोरोशी, वडवली, भादाने, शिवळे, आसोसे, एकलहरे, झाडघर, भोरांडे, फांगुळगव्हाण येथे कबरस्तान उभारण्यात येणार असून सोनगाव येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पोहोचरस्ता बांधण्यात येणार आहेत. याप्रकारे मुरबाडच्या ९२ गावांमध्ये ही कामे हाती घेतली आहेत, असे पवार यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: 15 gram panchayats of Murbad will be made shiny at a cost of Rs 3 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.