भिवंडीत १५ लाखांचे रसायन जप्त; राहनाळ येथे पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:35 AM2020-10-08T01:35:39+5:302020-10-08T01:36:38+5:30

तीन गोदामांमध्ये केला होता बेकायदा साठा

15 lakh chemicals seized in Bhiwandi | भिवंडीत १५ लाखांचे रसायन जप्त; राहनाळ येथे पोलिसांचा छापा

भिवंडीत १५ लाखांचे रसायन जप्त; राहनाळ येथे पोलिसांचा छापा

Next

भिवंडी : राहनाळ येथील श्री दत्ता कम्पाउंडमध्ये बेकायदा रसायनांचा साठा केलेल्या गोदामावर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. तेथून १५ लाखांचा साठा जप्त करत व्यापारी व व्यवस्थापकावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

श्रीदत्त कम्पाउंडमधील रसायनांनी भरलेल्या तीन गोदामांवर पोलिसांनी छापा टाकला. ते नवी मुंबई येथील व्यापारी दत्ता देशमुख यांचे आहेत. देशमुख यांनी वेअर हाउसिंग कंपनी सुरू करून रसायनांचा बेकायदा साठा केला होता. याबाबत नारपोली पोलिसांकडे स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार, पोलिसांनी गोदाम क्रमांक अ-१७ मध्ये ६६ ड्रम जप्त केले. यांची किंमत चार लाख ६२ हजार आहे. गोदाम क्रमांक अ-१८ मधून ५८ ड्रम जप्त केले. त्याची किंमत चार लाख सहा हजार रुपये आणि गोदाम क्रमांक बी-७ मध्ये ४२ ड्रम व १६१ किलो वजनाचे ४८ ड्रम जप्त केले. यांची किंमत तीन लाख ८४ हजार आहे. गोदामाचे व्यवस्थापक नंदकुमार चिकणे, व्यापारी देशमुख यांच्याविरोधात याप्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुटख्याची तस्करी करणाऱ्या पाच जणांना भिवंडीतून अटक
ठाणे : मुंबई-ठाणे परिसरात विक्रीसाठी जाणारा ३७ लाख ५५ हजार रु पयांचा गुटखा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मंगळवारी भिवंडीतून जप्त केला. याप्रकरणी विजय सिंग याच्यासह पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून गुटखा तसेच चार वाहनांसह सुमारे ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोरोनामुळे तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा तसेच तत्सम पदार्थांचे सेवन, विक्र ी आणि वाहतुकीवर बंदी आहे. तरीही गुटख्याची विक्र ी छुप्या रीतीने सुरूच आहे. भिवंडीतील जानकीबाई कम्पाउंड, वळगाव येथे गुटख्याचा साठा असून, त्याची ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरात तस्करी होत असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना मिळाली होती.

त्याआधारे पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने छापा टाकून मुंगीप्पा ट्रान्सपोर्टमधील चार वाहनांमध्ये साठवून ठेवलेला गुटखा जप्त केला. त्याचबरोबर ३७ लाखांची चार वाहने असा ७४ लाख ५५ हजार ९२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नारपोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस तसेच राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी कोपर, भिवंडे येथील आरोपी विजय सिंग याच्यासह इनामुल्ला रहमतुल्ला खान (४४, रा. चारकोप, मुंबई), बसावन खेदू प्रजापती (५२, निझामाबाद, उत्तर प्रदेश), गोविंद धोंडीराम तपघाले (३३, ठाणे) आणि अशरद अब्दुल खान (२८, नारपोली गाव, भिवंडी) या पाच जणांना या प्रकरणात अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने दिली आहे.

Web Title: 15 lakh chemicals seized in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.