शहरात आजपासून १५% पाणी कपात

By admin | Published: November 1, 2015 12:10 AM2015-11-01T00:10:48+5:302015-11-01T00:10:48+5:30

ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना, एम.आय.डी.सी., जलसंपदा विभाग व स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडील पाणी साठयाचे नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १ नोव्हेंबरपासून

15% water reduction from today | शहरात आजपासून १५% पाणी कपात

शहरात आजपासून १५% पाणी कपात

Next

ठाणे : ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना, एम.आय.डी.सी., जलसंपदा विभाग व स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडील पाणी साठयाचे नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १ नोव्हेंबरपासून शहरात रोज १५ टक्के पाणी पाणी कपात लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय पूर्वी जाहिर केल्याप्रमाणे शहरातील पाणीपुरवठा बुधवार आणि शुक्रवारी बंद राहणार आहे.
ठाणे शहराला आजच्या घडीला ४७० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. परंतु पाण्याच्या नियोजनातील अभाव आणि पाणी गळती यामुळे आधीच शहरातील काही भागांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात आता पुन्हा महापालिकेने पाणी कपात जाहीर केल्याने या भागांना पाणी टंचाईच्या मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना व स्टेम कंपनीकडून होणारा पाणी पुरवठयात आठवडयातील ६ दिवसाकरीता १५ टक्के प्रतीदिन कपात व प्रत्येक बुधवारी पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या कालावधीत ठाणे शहर, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, पातलीपाडा, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर व घोडबंदर रोड या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
तसेच एम.आय.डी.सी.कडून होणाऱ्या पाणी पुरवठयातही आठवडयातील ६ दिवसाकरीता १५ टक्के प्रतीदिन कपात करण्यात येणार असून प्रत्येक शुक्र वारी पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या कालावधीत कळवा, मुंब्रा व दिवा या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Web Title: 15% water reduction from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.