आईने मोबाईलमध्ये गेम खेळू नको सांगितल्याने १५ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

By धीरज परब | Published: July 2, 2024 08:12 PM2024-07-02T20:12:28+5:302024-07-02T20:14:36+5:30

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . 

15 year old boy ends life after his mother told him not to play mobile games  | आईने मोबाईलमध्ये गेम खेळू नको सांगितल्याने १५ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

आईने मोबाईलमध्ये गेम खेळू नको सांगितल्याने १५ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मोबाईल मध्ये अभ्यास करण्या ऐवजी मुलगा गेम खेळत असल्याचे पाहून आई ने अभ्यास कर म्हटले म्हणून १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली . 

भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील गणेश देवल नगरच्या क्रांती नगर रेश्मा इद्रिस बानो यांचा १५ वर्षांचा मुलगा सैफ हा अभ्यास करण्या ऐवजी मोबाईल वर गेम खेळत बसला होता . त्यावेळी आईने त्याला मोबाईल वर गेम न खेळता अभ्यास कर असे सांगितले .  त्याचा सैफ ह्याला राग आला आणि त्याने २९ जूनच्या सायंकाळी घरातच गळफास घेतला . त्याला भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले . या प्रकरणी आई रेश्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार भाईंदर पोलिसांनी रात्री अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत. ह्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . 

 

Web Title: 15 year old boy ends life after his mother told him not to play mobile games 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.