वॉर्डनपाठोपाठ १५० होमगार्ड

By admin | Published: July 20, 2015 03:19 AM2015-07-20T03:19:21+5:302015-07-20T03:19:21+5:30

वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राखण्यासाठी होमगार्ड मिळावे, या मागणीला शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर दोन महिन्यांतच १५० होमगार्डची फौज शहर

150 home guards after the Warden | वॉर्डनपाठोपाठ १५० होमगार्ड

वॉर्डनपाठोपाठ १५० होमगार्ड

Next

पंकज रोडेकर, ठाणे
वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राखण्यासाठी होमगार्ड मिळावे, या मागणीला शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर दोन महिन्यांतच १५० होमगार्डची फौज शहर आयुक्तालयात दाखल झाली असून ते वाहतूककोंडी सोडविताना दिसू लागले आहेत. आयुक्तालयातील पाच परिमंडळांत त्यांची विभागणीही केली असून भिवंडी आणि ठाण्यात प्रत्येकी ५० होमगार्ड दिले आहेत. वॉर्डनपाठोपाठ होमगार्डही मिळाल्याने वाहतूककोंडी सोडविण्यात मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची हद्द जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि कुळगाव-बदलापूर तसेच अंबरनाथ नगरपालिका अशा सहा स्थानिक स्वराज्य संस्थांभोवती पसरली आहे. तसेच वाहतूककोंडीसाठी २२ वाहतूक उपशाखा असून मंजूर ७६५ मनुष्यबळापैकी ६८९ तैनात आहे. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवलीत ७५ तर उल्हासनगरमध्ये २५ वॉर्डन तैनात आहेत. दिवसेंदिवस वाढणारे नागरीकरण आणि वाहनांची संख्या, अरुंद व खराब रस्ते, त्यांची दुरुस्ती तसेच स्थानिक प्राधिकरणाची सार्वजनिक वाहतूक, त्याचबरोबर खाजगी कंपन्या व मोठ्या नागरी वसाहतींची स्वतंत्र बससेवा, रिक्षा, टॅक्सी आणि महामार्गावर दिवसरात्र होणारी जड-अवजड वाहनांची वर्दळ, शहरातील वाढत्या मॉलच्या संख्येमुळे तसेच अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे मुख्य तसेच सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग या सर्वच गोष्टींमुळे वाहतुकीची दिवसेंदिवस समस्या जटील झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी शहर पोलिसांनी २०० होमगार्ड मिळावे, अशी मागणी राज्य शासनाकडे लावून धरली होती. त्यानुसार, शासनाने होमगार्ड देण्याचे मान्य केले होते. त्यातील १५० होमगार्ड वाहतूक विभागात दाखल झाले आहेत.

Web Title: 150 home guards after the Warden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.