ठाण्यात परवडणारी १६ हजार घरे; मुख्यमंत्र्यांकडून दिवाळीची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 06:40 AM2023-10-20T06:40:32+5:302023-10-20T06:40:48+5:30

किसन नगर, हाजुरी, टेकडी बंगला येथे महाप्रितच्या माध्यमातून क्लस्टर विकास

16 thousand affordable houses in Thane; Diwali gift from Chief Minister eknath Shinde | ठाण्यात परवडणारी १६ हजार घरे; मुख्यमंत्र्यांकडून दिवाळीची भेट

ठाण्यात परवडणारी १६ हजार घरे; मुख्यमंत्र्यांकडून दिवाळीची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील किसन नगर, हाजुरी तसेच टेकडी बंगला परिसरातील ४२.९६ हेक्टर परिसराचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास करून १६ हजार ५७८ घरे उभारली जाणार आहेत. महाप्रितमार्फत समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून त्या माध्यमातून ही परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

रहिवाशांना सध्याचे हक्काचे घर रिकामे न करता नव्याने मोकळ्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये हक्काचे घर प्राप्त होणार आहे. या क्लस्टर योजनेला पहिल्या टप्प्यात सिडकोच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. 

धोकादायक इमारतीतील रहिवाशांना लाभ 
nमहाप्रितच्या माध्यमातून टेकडी बंगरा, हाजुरी आणि किसन नगर ५ आणि ६ येथील क्लस्टरसाठी निधी उभा करण्याच्या प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 
nया प्रकल्पासाठी ६,०४९ कोटींचा खर्च केला जाणार आहे. ठाण्यातील किसन नगर यूआरपीमधील ५ व ६ यूआरसी, टेकडी बंगला आणि हाजुरी येथील क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रकल्प तीन वर्षांत हाेणार
घर उभारणीचा कालावधी हा साधारपणे ३ वर्षांचा गृहीत धरलेला आहे. तातडीने सल्लागार नियुक्त केला जाणार असून, त्यानंतर येथील प्लान तयार करून नकाशे मंजूर करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित अर्थात ‘महाप्रित’च्या माध्यमातून शासकीय भूखंड ताब्यात घेतले जात आहेत. 
त्यात कृषी भूखंड १.९३ हेक्टर (६० टक्के पुनर्वसन व ४० टक्के व्यावसायिक वापर), बुश इंडिया कंपनीचा भूखड २.२३ हेक्टर (१०० टक्के पुनर्वसन) असे एकूण ४.१६ हेक्टर भूखंडावर ५,०४७ पुनर्वसन सदनिका बांधल्या जाणार आहेत. ७९ हजार १०६ चौरस मीटर चटई क्षेत्र विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. पुनर्वसन सदनिकांसाठी ३,०८६ कोटी आणि पायाभूत सुविधांसाठी २,९६३ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. 

येथे होणार क्लस्टर   यूआरसी   अंदाजित क्षेत्रफळ     घरांचे पुनर्वसन  
टेकडी बंगला ६          १              ४.१७ हेक्टर            १२५७
हाजुरी ११                  १    १०.७६    १८९१
किसन नगर १२    ५,६     २८.०३                 १३४३०
एकूण                      -            ४२.९६ हेक्टर        १६,५८७
 

Web Title: 16 thousand affordable houses in Thane; Diwali gift from Chief Minister eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.