ठाण्यात बेडवरून पडली १६० किलो 'वजनदार' महिला; उचलण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 03:34 PM2023-09-07T15:34:08+5:302023-09-07T15:34:38+5:30
शरीराचे वजन जास्त असल्याने हालचालही होत नाही. गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास ही महिला तिच्या बेडवरून खाली पडली.
ठाणे – शहरात घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच अचंबित केले आहे. याठिकाणी १६० किलो वजन असणारी महिला बेडवरून खाली पडली. या महिलेने उचलण्यासाठी कुटुंबाने प्रत्येकाने बरेच प्रयत्न केले. मात्र महिलेचा भार इतका की कुणालाही ते शक्य झाले. त्यानंतर या महिलेला उचलण्यासाठी अग्निशमन दलाकडे मदत मागावी लागली. वाघबिळ येथील ही घटना आहे.
वाघबिळ येथे राहणारी ६२ वर्षीय महिला आजारी असल्याने तिला कुठेही बाहेर जाता येत नाही. शरीराचे वजन जास्त असल्याने हालचालही होत नाही. गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास ही महिला तिच्या बेडवरून खाली पडली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिला उचलून पुन्हा बेडवर झोपवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु काही केल्या या महिलेला उचलणे आव्हानात्मक बनले. कुटुंबासह स्थानिकांनी प्रयत्न करून पाहिले.
अखेर थकलेल्या कुटुंबाने अग्निशमन दलाला फोन करून मदत मागितली. त्यांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे एक पथक तिथे पोहचले आणि अथक प्रयत्नानंतर या महिलेला उचलून बेडवर झोपवले. या घटनेत महिलेला कुठलीही इजा झाली नाही. विभागीय अग्निशमन दलाने म्हटलं की, आम्हाला संकटकाळात अनेक कॉल येतात, परंतु आजची ही घटना असामान्य होती.