दहीहंडी उत्सवादरम्यान ठाण्यात १७ गोविंदा जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 08:36 PM2019-08-24T20:36:31+5:302019-08-24T20:37:49+5:30

जायबंदी झालेले गोंविदा हे सर्वात जास्त नौपाडा, विष्णूनगर येथे थर लावता जखमी झाले आहे.

17 Govinda injured in Thane dahi handi festival | दहीहंडी उत्सवादरम्यान ठाण्यात १७ गोविंदा जखमी 

दहीहंडी उत्सवादरम्यान ठाण्यात १७ गोविंदा जखमी 

googlenewsNext
ठळक मुद्देनऊजण हे मुंबईतील जोगेश्वरी, मालाड आणि मुलुंड येथील आहे. १७ जण जायबंदी झाले असून त्यामध्ये एक तरुणीचा समावेश आहे.

ठाणे - शहरात दहीहंडी उत्सवासाठी आलेल्या ठाणे - मुंबईतील गोंविदा पथक मानवी मनोरे उभारताना घसरून पडले. त्यात १७ जण जायबंदी झाले असून त्यामध्ये एक तरुणीचा समावेश आहे. नऊजण हे मुंबईतील जोगेश्वरी, मालाड आणि मुलुंड येथील आहे. जायबंदी झालेले गोंविदा हे सर्वात जास्त नौपाडा, विष्णूनगर येथे थर लावता जखमी झाले आहे.

मुलुंड येथील सुजय भेरेकर (26), राहुल पेलान (27), ठाणे आनंदनगर येथील कुणाल यादव (10), मालाडची रकक्षा भगत (19) आणि जोगेश्वरी येथील महेश धुरी (24), योगेश देसाई (19), संकल्प पवार (21) विवेक कोचरेकर (32) विपुल सिंग (24) अविनाश वारिक (23)अभिषेक अदाते(25), संतोष पवार (30) आणि सुशांत थोरात (20) तसेच ठाण्यातील सतीष जाधव (35 ) अशी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतलेल्या जखमी गोविंदांची नावे असून ठामपा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेऊन तिघांना सोडले असून त्यांची नावे समजू शकली नाहीत. त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. ठाण्यात १७ जण जखमी झाले असून १४ जणांवर जिल्हा तर ३ जणांवर ठामपाच्या छत्रपती शिवाजी महाराज उपचार करुन घरी सोडले आहे. बहुतांश गोंविदा किरकोळ जखमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

Web Title: 17 Govinda injured in Thane dahi handi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.