ठाणे जिल्ह्यात १ हजार ७५२ रुग्णांची वाढ, ५० जणांचा काेराेनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:01 AM2021-05-10T10:01:46+5:302021-05-10T10:06:23+5:30
ठाणे शहर परिसरात ४०६ रुग्णांची वाढ होऊन सात जणांचा मृत्यू झाला.
ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत एक हजार ७५२ रुग्णांची वाढ झाली आहे. रविवारी ५० जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या आठ हजार ५३ झाली, तर आतापर्यंत रुग्णसंख्या चार लाख ८८ हजार ७७९ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ४०६ रुग्णांची वाढ होऊन सात जणांचा मृत्यू झाला. या शहरात एकूण एक लाख २४ हजार १२३ रुग्णांसह एक हजार ७५१ मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत ५०५ रुग्णांची वाढ, तर १९ जणांचा मृत्यू झाला. या शहरातील रुग्णसंख्या एक लाख २६ हजार ४६५ झाली असून, मृतांची संख्या आता एक हजार ५४९ झाली आहे.
उल्हासनगरला ३४ रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला. येथील मृतांची संख्या आता ४४६ झाली असून, रुग्णसंख्या १९ हजार ४०९ नोंदवली आहे. भिवंडीत ३३ रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. या शहरात १० हजार ६८ रुग्णांसह ४०३ मृतांची नोंद करण्यात आली. मीरा - भाईंदरलाही १८६ रुग्णांच्या वाढीसह आज आठ जणांचा मृत्यू झाला. येथील रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ९४८ झाली असून, मृतांची संख्या एक हजार ११३ नोंद झाली.
अंबरनाथ शहरात ७१ रुग्ण वाढल्याने येथील रुग्णसंख्या आता १८ हजार ४८८ झाली. एकाचा मृत्यू होऊन एकूण ३९४ मृतांची नोंद करण्यात आली.
बदलापूरला ८४ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. येथील एकूण रुग्ण संख्या १९ हजार ५७४ व मृत्यू २११ नोंदवले गेले आहेत. ग्रामीण भागात १९४ रुग्ण आढळले असून, सहा मृत्यू झाले. आता जिल्ह्यातील २९ हजार ५५८ रुग्णांसह ७३६ मृतांची नोंद करण्यात आली.