ठाण्यात एटीएमसह १७.९६ लाखांची चोरी: उल्हासनगरमधून पाचव्या तर सहाव्या आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:52 AM2020-06-13T00:52:26+5:302020-06-13T00:55:32+5:30

एक्सीस बँकेच्या अ‍ॅटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) संचाची १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह चोरी करणाऱ्या आठ जणांच्या टोळीपैकी आणखी एकाला उल्हासनगरमधून तर दुस-याला उत्तरप्रदेशातून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. या टोळीकडून चार लाख ४० हजार ९०० ची रोकड, मोटारकार आणि एटीएम संच हस्तगत करण्यात आले आहे.

17.96 lakh theft including ATM in Thane: 5th accused arrested from Ulhasnagar and 6th accused arrested from Uttar Pradesh | ठाण्यात एटीएमसह १७.९६ लाखांची चोरी: उल्हासनगरमधून पाचव्या तर सहाव्या आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक

आणखी दोघांचा शोध सुरुच

Next
ठळक मुद्देचार लाख ४० हजारांच्या रोकडसह सात लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्तआणखी दोघांचा शोध सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दहिसर गावातील एक्सीस बँकेच्या अ‍ॅटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) संचाची १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह चोरी करणा-या आठ जणांच्या टोळीपैकी आणखी एकाला उल्हासनगरमधून तर दुसºयाला उत्तरप्रदेशातून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. या सर्वच टोळीकडून चार लाख ४०हजार ९०० ची रोकड आणि मोटरकार असा सात लाख ४० हजार ९०० चा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे तालुक्यातील दहिसर ग्रामपंचायतीजवळील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम केंद्रातील एटीएम संच हे १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह ८ जून रोजी चोरण्यात आले होते. याप्रकरणी डायघर पोलिसांबरोबर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट एकचे पथकही समांतर तपास करीत असतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अतुल दवणे, सूरज म्हात्रे , दादासाहेब उर्फ सूरज कांबळे आणि फुलाजी गायकर या ११ जून रोजी अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार दत्तत्रय सरक, रवींद्र काटकर, पोलीस नाईक संजय बाबर आणि महापुरे आदींच्या पथकाने उल्हासनगर येथून १२ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारा या टोळीतील पाचवा आरोपी रशिरौफ सय्यद (३५, रा. उल्हासनगर, कॅम्प क्रमांक ३) याला अटक केली. तर टोळीच्या सूत्रधारापैकी एक भीमा बहाद्दूर जोरा हा नेपाळमध्ये पळून जाण्याच्या बेतात असतांना उत्तरप्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्सचे पोलीस उपअधीक्षक पी. के. मिश्रा यांच्या पथकाने त्याला उत्तरप्रदेशातील कानपूर भागातून ११ जून रोजी ताब्यात घेतले. त्यालाही सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, विक्रांत कांबळे आणि दादा पाटील यांच्या पथकाने १२ जून रोजी उत्तरप्रदेश पोलिसांकडून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. टोळीतील उर्वरित दोघांनाही लवकरच अटक केली जाईल असा विश्वास या पथकाने व्यक्त केला आहे.
* अशी मिळाली रोकड
अटकेतील आरोपींपैकी सुरेश म्हात्रे याच्याकडून दोन लाख दहा हजार रुपयांची रोकड , फुलाजी गायकर याच्याकडून ४७ हजार ५०० तर सूरज कांबळे याच्याकडून एक लाख ८३ हजार ४०० अशी चार लाख ४० हजार ९०० ची रोकड आणि म्हात्रे याच्या घराच्या समोरुन चोरीसाठी वापरलेली तीन लाखांची मोटारकार आणि हाजीमलंग डोंगराजवळील एका खदाणीतून एटीएम संच असा सात लाख ४० हजार ९०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

Web Title: 17.96 lakh theft including ATM in Thane: 5th accused arrested from Ulhasnagar and 6th accused arrested from Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.