आंबा उत्पादकांच्या खात्यात १८ कोटींची मदत; साडेतीन हजार शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:23 AM2020-09-12T01:23:25+5:302020-09-12T07:15:53+5:30

पालघरला सर्वाधिक ११ कोटींची विमाभरपाई

18 crore assistance to mango growers; Benefit to three and a half thousand farmers | आंबा उत्पादकांच्या खात्यात १८ कोटींची मदत; साडेतीन हजार शेतकऱ्यांना लाभ

आंबा उत्पादकांच्या खात्यात १८ कोटींची मदत; साडेतीन हजार शेतकऱ्यांना लाभ

Next

ठाणे : गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकºयांनी विमा काढलेला असल्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम आता त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. यामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यांतील साडेतीन हजार शेतकºयांना तब्बल १८ कोटींच्या नुकसानभरपाईचा लाभ झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना साडेसहा कोटी, तर पालघरच्या शेतकºयांना ११ कोटींपेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाली आहे.

आंबा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. सुदैवाने त्यांनी विमा काढलेला होता. आता त्या नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एक हजार २९४ शेतकºयांच्या बँक खात्यांत सहा कोटी ६१ लाख ४६ हजार रुपये जमा झाले असून १०० टक्के शेतकºयांना ही भरपाई मिळाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले. या शेतकºयांनी त्यांच्या ८० हजार आंब्यांच्या झाडांचा विमा काढला होता.

एका झाडाला मिळाली ८३३ रुपयांची भरपाई

ठाणे जिल्ह्यातील एक हजार २९४ शेतकºयांनी त्यांच्या ८० हजार झाडांचा विमा काढला असता, त्यापोटी या शेतकºयांनी ५० लाख ४४ हजार रुपये विमाहप्ता भरला होता. त्यानुसार एका झाडाला ८३३ रुपये भरपाईची रक्कम मंजूर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या थेट बँक खात्यात सहा कोटी ६१ लाख ४६ हजारांपेक्षा अधिक रक्कम विमा कंपनीने जमा केली आहे.

पालघरच्या २१९५ शेतकºयांना लाभ : पालघर जिल्ह्यातील दोन हजार १९५ शेतकºयांना आंबा व काजूच्या नुकसानभरपाईपोटी तब्बल ११ कोटी ११ लाख ९४ हजार रुपये नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे. यामध्ये दोन हजार १६३ आंबा उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी ९० लाख १२ हजारांचा विमाहप्ता भरला होता. उर्वरित ३२ काजू उत्पादक शेतकºयांपैकी २३ शेतकºयांना ८९ हजार ८४५ रुपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे.

Web Title: 18 crore assistance to mango growers; Benefit to three and a half thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा