आमिष दाखवून १८ लाखांची फसवणूक
By admin | Published: April 10, 2017 05:43 AM2017-04-10T05:43:41+5:302017-04-10T05:43:41+5:30
जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांना १८ लाख ६४ हजार ५०० रुपयांना गंडा घालणाऱ्या
ठाणे : जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांना १८ लाख ६४ हजार ५०० रुपयांना गंडा घालणाऱ्या भाईचंद रायसोनी मल्टी को-आॅप. क्रेडिट सोसायटी लि.चे अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांच्यासह चौघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
रायसोनी यांच्यासह डॉ. हितेंद्र महाजन, सुकलाल माळी आणि नंदकुमार लालवानी या पदाधिकाऱ्यांनी २८ नोव्हेंबर २०१३ ते २६ सप्टेंबर २०१४ या एक वर्षाच्या कालावधीत एका प्रसिद्धिमाध्यमात संजीवनी ठेव योजनेची जाहिरात दिली. यामध्ये आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून दिवा दातिवली येथील वामन पाटील यांनी गुंतवलेली १८ लाख ६४ हजार ५०० ची रक्कम १३ टक्के व्याजासह परत केली नाही. त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना ही रक्कम न दिल्याने याप्रकरणी त्यांनी अखेर ८ एप्रिल २०१७ रोजी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.एस. वाघमारे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)