आरटीई प्रवेशासाठी १८  हजार ८०७ अर्ज प्राप्त प्रवेशासाठी ४ जूनपर्यत मुदतवाढ 

By प्रज्ञा म्हात्रे | Published: June 1, 2024 03:33 PM2024-06-01T15:33:59+5:302024-06-01T15:34:18+5:30

प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ४ जून पर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत पालकांनी अर्ज भरणे आवश्यक आहे.

18 thousand 807 applications received for rte admission extension till june 4 for admission  | आरटीई प्रवेशासाठी १८  हजार ८०७ अर्ज प्राप्त प्रवेशासाठी ४ जूनपर्यत मुदतवाढ 

आरटीई प्रवेशासाठी १८  हजार ८०७ अर्ज प्राप्त प्रवेशासाठी ४ जूनपर्यत मुदतवाढ 

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे जिल्ह्यात ३१ मेपर्यंत आरटीई प्रवेशासाठी ११ हजार ३७७ जागासाठी १८ हजार ८०७ अर्ज प्राप्त झाले आहेत. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने १७ मे पासून सुरु करण्यात आली असून ती ०४ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे
असे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले आहे. 

प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ४ जून पर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत पालकांनी अर्ज भरणे आवश्यक आहे. ४ जून नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही अशी माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी दिली. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण ६४२ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३७७ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

Web Title: 18 thousand 807 applications received for rte admission extension till june 4 for admission 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.