जिल्ह्यात १,८१,२५६ नागरिक कोरोनामुक्त, जलद उपचारांमुळे रुग्णांना मिळतोय दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 11:52 AM2020-10-20T11:52:22+5:302020-10-20T11:53:56+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे १० लाख ७१ हजार ९९५ संशयित रुग्ण आढळले. त्यातील आठ लाख ७० हजार २७८ जणांना बाधाच झालेली नाही.

1,81,256 citizens free of corona in the district | जिल्ह्यात १,८१,२५६ नागरिक कोरोनामुक्त, जलद उपचारांमुळे रुग्णांना मिळतोय दिलासा

जिल्ह्यात १,८१,२५६ नागरिक कोरोनामुक्त, जलद उपचारांमुळे रुग्णांना मिळतोय दिलासा

Next

सुरेश लोखंडे 

ठाणे : जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेची कसोटी लागली. मात्र, योग्य उपचारांबरोबरच लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासकीय यंत्रणांनीही जीवाची पर्वा न करता नियमांचे पालन करण्याबाबत जागृती केल्याने  आतापर्यंतच्या दोन लाख ४७० रुग्णांपैकी एक लाख ८१ हजार २५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे १० लाख ७१ हजार ९९५ संशयित रुग्ण आढळले. त्यातील आठ लाख ७० हजार २७८ जणांना बाधाच झालेली नाही. दरम्यान, गणेशोत्सवात काहींनी हलगर्जी केल्याने रुग्णवाढीचा आलेख उंचावला. आताही दिवसाकाठी जिल्ह्यात एक हजारावर रुग्ण सापडत आहे. आजपर्यंत पाच हजार ७० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, तत्काळ बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रुग्णालयातील खाटा लवकर रिकाम्या होऊन अन्य रुग्णांना वेळेत व जलद उपचार  मिळत आहेत. 

खासगी कोविड सेंटरचा दररोजचा खर्च? 
खासगी कोविड सेंटरचा खर्च हा त्या रुग्णालयातील एकूण बेड आणि त्यासाठी असलेले डॉक्टर यावर अवलंबून असतो. तरीपण, महिन्याला अंदाजे २० ते २५ लाखांचा खर्च महिन्याला येतो. 

 खासगी कोविड सेंटर सुरू करून उपचार केले. या रुग्णालयासाठी खिशातून खर्च केला. खर्च परवडत नसल्याने रुग्णालय १५ ऑक्टोबरला बंद केले.   - डॉ. प्रमोद पष्टे, मुरबाड

जिल्ह्यात कोविड सेंटरची परिस्थिती
ठाणे शहरात जिल्ह्यात सर्वाधिक खासगी आठ रुग्णालये सुरू असून कल्याण-डोंबिवली परिसरात सर्व मिळून अवघी सात रुग्णालये, भिवंडीला खासगी आठ, पाच रुग्णालये पण त्यातील खाटांच्या संख्येचा अहवाल मनपाकडे नाही. मीरा-भाईंदरला खासगी १५ रुग्णालये, तर अंबरनाथ, बदलापूरला प्रत्येकी दोन खासगी रुग्णालये सुरू आहेत. या रुग्णालयांचे आयसीयू, व्हेंटिलेटर आदींच्या उपलब्धतेची व रिकामे आहेत की सुरू आहेत आदींची माहिती स्थानिक प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे आढळून आले. यामुळे यामागील काय गौडबंगाल आहे, हा सध्या संशोधनाचा विषय बनला आहे.

शासकीय रुग्णालयांत उपचार
 काही खासगी रुग्णालयांनी उपचाराचे अव्वाच्या सव्वा बिल काढल्याच्या गंभीर घटना घडल्या. त्यामुळे सध्यातरी रुग्णांची ओढ शासकीय रुग्णालयांकडे अधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश खासगी रुग्णालयांना घरघर लागली आहे. त्यांचा दैनंदिन खर्च सध्या निघत नसल्यामुळे ती बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. परंतु, जिल्ह्यातील एकही खासगी रुग्णालय रुग्णांअभावी बंद पडलेले नाही.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक 
 

Web Title: 1,81,256 citizens free of corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.