ठाण्यात इमारतीमधील १८ व्या मजल्यावरील फ्लॅटला आग; १० रहिवाशांची सुखरुप सुटका
By अजित मांडके | Published: October 5, 2022 04:06 PM2022-10-05T16:06:24+5:302022-10-05T16:08:18+5:30
रामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना देखील त्याचा त्रास झाला. त्यातून १० रहिवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली.
ठाणे - घोडबंदर भागातील ब्रम्हांड सिग्नलजवळ असलेल्या हिरानंदानी पार्क येथील प्रिस्टन इमारतीमधील १८ व्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. घर बंद असल्याने ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. मात्र आगीची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एक तासाच्या परिश्रमानंतर ही आग विझविण्यात आली. यावेळी धुरामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना देखील त्याचा त्रास झाला. त्यातून १० रहिवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली.
बुधवारी दुपारी १.३० च्या सुमारास हिरानंदानी पार्क येथील प्रिस्टन या २७ मजल्याच्या इमारतीमधील १८ मजल्याच्या प्रशांत कामंत यांच्या फ्लॅटला आग लागल्याची घटना घडली. आग लागली त्यावेळी त्यांचे घर बंद होते. परंतु धुराचा लोळ बाहेर येऊ लागल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी बाळकुम अग्निशमन दलाला याची वर्दी दिली. तसेच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला देखील याची माहिती देण्यात आली. त्यानंतर या दोनही यंत्रणा घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या.
अग्निशमन दलाचे जवान १ फायर वाहन व १ रेस्क्यू वाहनाच्या सहाय्याने एक तास शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर ही आग विझविण्यात आली. तर आगीमुळे धुराचे लोळ सर्वत्र पसरले होते. याचा त्रस आजूबाजूच्या रहिवाशांना देखील झाला. त्यानुसार अग्निशमन विभागाचे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथील १० रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली. परंतु ही आग नेमकी कशामुळे याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.