डोंबिवलीतील मराठी मुलाने घेतली जैन धर्माची दीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 02:24 PM2018-04-27T14:24:27+5:302018-04-27T14:24:27+5:30
डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगर परिसरातील राहणाऱ्या 19 वर्षीय मंदार म्हात्रे मराठी तरुणाने आज शेकडो जैन बांधव आणि त्याच्या नातेवाइकांच्या साक्षीने जैन धर्मात प्रवेश करून जैन मुनीची दीक्षा स्वीकारली.
डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगर परिसरातील राहणाऱ्या 19 वर्षीय मंदार म्हात्रे मराठी तरुणाने आज शेकडो जैन बांधव आणि त्याच्या नातेवाइकांच्या साक्षीने जैन धर्मात प्रवेश करून जैन मुनीची दीक्षा स्वीकारली. त्यामुळे सांस्कृतिक राजधानीत एक वेगळं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
मंदार हा एस केपी समाजातील मराठी तरुण आहे, तो लहानपणापासून शेजारच्या मधुबन यांच्या सोबत जैन मंदिरात जात असे, तेव्हापासून त्याच्यावर जैन समाजातील परंपरा, रूढी याचा प्रभाव आहे. मंदिरात जात असल्याने त्याने अनेक संस्कार शिबीर दौरे केले, ज्यांना मुलबाळ नाही अशा मधुबेनने हा मार्ग त्यांना दाखवला, असं त्याचं म्हणणं आहे.
त्याच्या वडिलांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. त्याच्या भविष्याचा दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे. तो आम्हाला भेटू शकत नाही, मात्र आम्ही त्याला नक्कीच भेटू शकतो. कोणत्याही दबावाखाली आम्ही निर्णय घेतलेला नाही. आमच्या मुलाने जैन मुनी व्हायची इच्छा आमच्याजवळ व्यक्त केली होती. एकुलता एक मुलगा असल्याने सुरुवातीला त्याचं मन तयार होत नव्हतं. पण मुलाने प्रामाणिकपणे हाच मार्ग निवडण्याचं ठरविल्याने घरच्यांनी होकार दिला आहे. सांस्कृतिक मराठी शहरात एका मराठी तरुणाने घेतलेली जाजन धर्म स्वीकारून जैन मुनी दीक्षा घेतली आहे, यावर सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.