कंपनीची २ कोटी १६ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:10 AM2018-06-13T04:10:59+5:302018-06-13T04:10:59+5:30
इंडोनेशियामध्ये कंपनीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने पाठवलेले कंपनीचे उपाध्यक्ष अस्लम शेख याने इंडोनेशियातील एका महिलेच्या मदतीने कंपनीला २ कोटी १६ लाख ३८ हजार रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार कंपनी व्यवस्थापकाने दिल्याने मानपाडा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली - इंडोनेशियामध्ये कंपनीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने पाठवलेले कंपनीचे उपाध्यक्ष अस्लम शेख याने इंडोनेशियातील एका महिलेच्या मदतीने कंपनीला २ कोटी १६ लाख ३८ हजार रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार कंपनी व्यवस्थापकाने दिल्याने मानपाडा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पिटी इमको ग्लोबल टेककॉन या कंपनीचे जयदीप दत्तगुप्ता (५५, रा. पवई) हे व्यवस्थापक आहेत. भारतातील कंपनीला इंडोनेशिया येथे व्यापार विस्तार करायचा असल्याने कंपनीने उपाध्यक्ष अस्लम शेख यांना फेब्रुवारी २०१६ मध्ये इंडोनेशियाला पाठवले. मात्र, शेखने त्याला दिलेल्या कुलमुखत्यारपत्राचा तसेच, अधिकारांचा गैरवापर करीत करारामधील अटीशर्तींचा भंग केला. तसेच, इंडोनेशियातील कंपनीच्या व्यापार विस्तार व्यवस्थापक असलेल्या संगीता निंद्या पुत्री हिच्यासोबत संगनमत केले आणि कंपनीने पाठविलेला माल इंडोनेशियात चढ्या दराने विकून त्यातून मिळालेल्या नफ्याची रक्कम कंपनीस न देता २ कोटी १६ लाख ३८ हजारांची फसवणूक केली. तसेच, कंपनीची बदनामी केली.