अंबरनाथ नगरपालिकेच्या २ शाळा झाल्या सेमी इंग्रजी

By पंकज पाटील | Published: June 19, 2023 05:44 PM2023-06-19T17:44:49+5:302023-06-19T17:45:57+5:30

अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरात १७ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे.

2 schools of Ambernath municipality became semi English | अंबरनाथ नगरपालिकेच्या २ शाळा झाल्या सेमी इंग्रजी

अंबरनाथ नगरपालिकेच्या २ शाळा झाल्या सेमी इंग्रजी

googlenewsNext

अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले आहे. आज या दोन शाळांचे उद्घाटन आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. काळासोबत चालण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणं आवश्यक असल्याचं मत यावेळी आमदार बालाजी किणीकर यांनी व्यक्त केले. 

अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरात १७ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये जवळपास २२०० विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. मात्र काळानुरूप इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढू लागल्याने पालिकेच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळांमध्येही इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, या उद्देशाने अंबरनाथ नगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले आहे.

अंबरनाथ पालिकेची शाळा क्रमांक १ आणि ८ मध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आतर असून या शाळांचं आज आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांच्यासह पालिकेचे अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. काळासोबत चालण्यासाठी सध्या २ शाळा सेमी इंग्रजी माध्यमातून सुरू करण्यात आल्या असून येत्या काळात आणखी ५ शाळा इंग्रजी माध्यमातून सुरू करण्यात येतील, अशी माहिती यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.

Web Title: 2 schools of Ambernath municipality became semi English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.