ठाणे जिल्ह्यात शनिवारी २ हजार ८६९ नव्या कोरोना बाधितांची वाढ, ५३ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 09:44 PM2021-05-01T21:44:27+5:302021-05-01T21:44:56+5:30
जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरातील ७३२ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे येथील रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ६५३ झाली.
ठाणे- जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत शनिवारी दोन हजार ८६९ रूग्णांची वाढ झाली. यामुळे रुग्ण संख्या आता चार लाख ७० हजार ५० झाली आहे. तर आज ५३ जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा आता सात हजार ६४३ वर पोहोचला आहे. (2 thousand 869 new corona cases increased in Thane district on Saturday, 53 people died)
जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरातील ७३२ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे येथील रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ६५३ झाली. या शहरात ९ जणांच्या मृत्यूने एक हजार ६८१ मृतांची नोंद झाली. याप्रमाणेच कल्याण डोंबिवलीत ८२२ रुग्णांच्या वाढीमुळे या महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या एक लाख २१ हजार ५४२ नोंदली गेली आहे. आजही या शहरात ११ जणांचा मृत्यू झाल्याने येथील मृतांची संख्या एक हजार ४४५ झाली.
उल्हासनगरला ११० रुग्णांसह चार मृतांची आज वाढ झाली. या शहरात आता १८ हजार ९४९ रुग्णांची व ४३४ मृतांची नोद झाली. भिवंडी मनपा क्षेत्रातही २२ रुग्णांमुळे आता नऊ हजार ८७२ रुग्णांची नोंद झाली. दोन मृत्यू झाल्याने ३९१ मृत्यू कायम आहे. मीर भाईंदरला ३५९ रुग्णाची आज वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या ४३ हजार ९२७ नोंद केली. आज दहा रुग्णांच्या मृत्यूने आतापर्यंत एक हजार ४१ मृतांची नोंद झाली.
अंबरनाथला १३२ रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या १७ हजार ८४५ झाली. या शहरात पाच मृत्यू झाले असता ३८६ एकूण मृतांची नोंद झाली. कुळगांव बदलापूरला १४८ रुग्ण वाढीने १८ हजार ६५६ रुग्णांची नोंद झाली. दोघांच्या मृत्यूने येथील मृतांची संख्या १९४ झाली. याशिवाय जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये आज १६३ रुग्णांची वाढ होऊन एकूण २६ हजार ७८२ रुग्णांची नोंद केली. या गांवपाड्यांमध्ये आज दोन जणांच्या मृत्यूने आजपर्यंत ६९४ मृतांची नोंद करण्यात आली आहे.