हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी धूलिकण नियंत्रण यंत्रणा असलेली २ वाहने महापालिकेत दाखल 

By धीरज परब | Published: March 29, 2023 02:30 PM2023-03-29T14:30:05+5:302023-03-29T14:31:15+5:30

हवेतील धूलिकण विविध प्रकारे पाण्याचा मारा करून कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे . 

2 vehicles with dust control system introduced in mira bhayander municipal corporation to reduce dust in the air | हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी धूलिकण नियंत्रण यंत्रणा असलेली २ वाहने महापालिकेत दाखल 

हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी धूलिकण नियंत्रण यंत्रणा असलेली २ वाहने महापालिकेत दाखल 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातील निधीमधून मीरा भाईंदर महापालिकेने धूलिकण नियंत्रण यंत्रणा असलेली २ वाहने सुमारे ५ कोटींना खरेदी केली आहेत.  हवेतील धूलिकण विविध प्रकारे पाण्याचा मारा करून कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे . 

शहरात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची बांधकामे तसेच जुन्या इमारती वा बांधकामे तोडणे , दुरुस्ती कामे, खोदकाम आदी सुरु आहेत. त्यातून घातक अश्या सिमेंट व खडीच्या कणांचे प्रमाण हवेत वाढले आहे . त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून पर्यावरणाचे नुकसान होत आहे . 

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातुन मिळालेल्या निधीतून महापालिकेच्या पर्यावरण विभागा मार्फत धूलिकण नियंत्रण यंत्रणा असलेली २ वाहने खरेदी करण्यात आली आहे . मंगळवारी सदर वाहने मुख्यालयात आणण्यात आली होती . आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर, उपायुक्त संजय शिंदे, रवी पवार व कल्पिता पिंपळे सह काही माजी नगरसेवक, पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत यंत्रणेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली . 

धुळीचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी यंत्रणे द्वारे वेगवेगळ्या प्रकारे पाण्याचा फवारा करून धूलिकण कमी करण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे . शिवाय रस्ते व दुभाजके धुवून काढणे, दुभाजकां मधील झाडांना पाणी देणे, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांवरील धूलिकण धुवून काढणे तसेच अत्यावश्यक परिस्थितीत आग विझवण्यासाठी देखील या यंत्रणेचा वापर केला जाणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे . 

एक वाहन भाईंदर मध्ये तर दुसरे मीरारोड भागात कार्यरत राहणार आहे . सदर वाहनांची देखभाल - दुरुस्ती हि ठेकेदारा मार्फतच केली जाणार असून तसा ५ वर्षांचा करार पालिकेने केला आहे . 

दिलीप ढोले ( आयुक्त ) - शहरात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने विविध माध्यमातून धूलिकण हवेत पसरतात . नागरिकांना श्वास घेण्यासाठी चांगली हवा ठेवण्याचे काम ह्या धूलिकण नियंत्रण वाहनांच्या द्वारे केले जाणार आहे . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: 2 vehicles with dust control system introduced in mira bhayander municipal corporation to reduce dust in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.