बेडरूममध्ये अडकलेल्या २ वर्षीय चिमुकलीची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 01:10 PM2022-07-08T13:10:07+5:302022-07-08T13:10:37+5:30

Safely Released : बेडरूमच्या दरवाजाचे लॅश लॉकमध्ये बिघाड होऊन दरवाजा लॉक झाल्याने दोन वर्षीय मेहेर मिश्रा ही चिमुकली अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

2-year-old girl kid, who was trapped in the bedroom, was safely released | बेडरूममध्ये अडकलेल्या २ वर्षीय चिमुकलीची सुखरूप सुटका

बेडरूममध्ये अडकलेल्या २ वर्षीय चिमुकलीची सुखरूप सुटका

Next

ठाणे : घोडबंदर रोड,ओवळा येथील अटलांटिक टॉवरच्या अकराव्या मजल्यावरील खोली क्रमांक-११०३ मधील खोलीतील बेडरूममध्ये  अडकलेल्या दोन वर्षीय चिमुकलीला माहिती मिळाल्यानंतर काही मिनिटांत सुखरूप बाहेर काढण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास समोर आली. बेडरूमच्या दरवाजाचे लॅश लॉकमध्ये बिघाड होऊन दरवाजा लॉक झाल्याने दोन वर्षीय मेहेर मिश्रा ही चिमुकली अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
     

ओवळा येथील अटलांटिक टॉवरच्या अकराव्या मजल्यावरील बेडरूम चिमुकली अडकली असल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान १-रेस्क्यु वाहन व १-फायर वाहनासह दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या खोलीच्या दरवाजाचे लॅश लॉक डोअर ब्रेकरच्या सहाय्याने तोडून त्या चिमुरडीला सुखरूप सुटका केल्यावर त्या मायलेकींची भेट झाली. ही खोली प्रियांका मिश्रा यांच्या मालकीची आहे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

Read in English

Web Title: 2-year-old girl kid, who was trapped in the bedroom, was safely released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.