मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला पालिकेचे २० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 01:23 AM2018-12-07T01:23:53+5:302018-12-07T01:24:03+5:30

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात आणखी इमारत उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडून २० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी केली.

20 crore of Municipal Corporation's Thane sub-center | मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला पालिकेचे २० कोटी

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला पालिकेचे २० कोटी

Next

ठाणे : मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात आणखी इमारत उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडून २० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी केली. उपकेंद्राला निधी देण्याबरोबरच आणखी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला महासभेची मान्यता घेण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या पुढाकारानुसार, मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील अडचणी सोडवण्याबाबत महापालिकेत बैठक घेण्यात आली. या बैठकीला कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे, माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र, डॉ. अजय भामरे, उपकेंद्राचे प्रभारी चंद्रशेखर मराठे आदी उपस्थित होते.
ठाणे उपकेंद्रात बीबीए, एलएलबी व बीएमएस, एमबीए अभ्यासक्र म सुरू असून ३५० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, बीबीए, एलएलबी अभ्यासक्र मासाठी पूर्णवेळ शिक्षक कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत होती. या मुद्यांसंदर्भात आमदार डावखरे यांनी उपकेंद्राला १९ आॅक्टोबर रोजी भेट दिली होती. त्यावेळी उपकेंद्रातील गैरसोयी त्यांच्यासमोर आल्या होत्या. त्यांनी याबाबत प्रभारी संचालक डॉ. चंद्रशेखर मराठे यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाकडे काही प्रश्न प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले होते.
उपकेंद्राकडे जाणारा रस्ता, टीएमटी बससेवेची अपुरी संख्या, विद्यापीठाकडे जाण्यासाठी दिशानिर्देश करणारे फलक आदींबाबत चर्चा झाली होती.
या प्रश्नांसंदर्भात डावखरे यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार, महापालिकेत ही बैठक घेण्यात आली.
यानुसार, उपकेंद्रात आणखी एक इमारत उभारण्यासाठी २० कोटी रु पयांचा निधी दिला जाईल. उपकेंद्राच्या इमारतीची ओसी, टीएमटी बससेवेच्या वाढीव फेऱ्या, उपकेंद्राकडे जाण्यासाठी पक्का रस्ता, दिशादर्शक फलक आदींचे काम सुरू केले जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले. या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मान्यता घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती डावखरे यांनी दिली.
>जादा शिक्षक नियुक्तीचा आग्रह
ंठाणे येथील उपकेंद्रात शिक्षकांच्या अपुºया संख्येमुळे अडचणी येत असल्याकडे आमदार डावखरे यांनी कुलगुरू पेडणेकर यांचे लक्ष वेधले. तसेच जादा शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी केली. त्यावेळी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Web Title: 20 crore of Municipal Corporation's Thane sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे