विषप्रयोग करून २० कुत्र्यांचा बळी; अंबरनाथमधील धक्कादायक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:33 AM2019-06-05T00:33:31+5:302019-06-05T00:33:37+5:30
पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना २० कुत्रे आणि सात मांजरींचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्रे आणि मांजरींचा मृत्यू झाल्याने विषप्रयोग करण्यात आल्याचे समोर आले आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ येथील स्थानक परिसरातील भीमनगर भागात सोमवारी रात्री अनोळखी व्यक्तीने अन्नातून विषप्रयोग केल्यामुळे २० कुत्रे आणि सात मांजरींचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सकाळी स्थानिक रहिवाशांना चार ते पाच कुत्रे हे परिसरात मृतावस्थेत आढळले. सुरूवातीला हा प्रकार गंभीर वाटला नाही. मात्र इतर ठिकाणीही काही कुत्रे मृतावस्थेत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी या घटनेची माहिती पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनालाही स्थानिकांनी दिली. पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना २० कुत्रे आणि सात मांजरींचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्रे आणि मांजरींचा मृत्यू झाल्याने विषप्रयोग करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा विषप्रयोग कशातून करण्यात आला आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. अन्न पदार्थातून हा प्रयोग झाल्याचे समोर येत आहे. या परिसरातील सर्व कचरा कुंड्यांमधील अन्न पदार्थांचे नमुने एकत्रित करून नेमका कोणता विषप्रयोग झाला आहे याची माहिती घेतली जात आहे.
मुरबाड तालुक्यात विषारी औषधामुळे बकऱ्यांचा मृत्यू
तालुक्यातील पाटगाव येथील बकऱ्यांना दोन महिन्यांपासून विषारी औषध टाकून जीवे मारण्याची मालिका समाजकंटकाडून सुरूच आहे. सोमवारीही दहा ते पंधरा बकºयांना विषारी औषध घालून मारण्यात आले. पाटगाव परिसरात पठारावर वास्तव्य करत असलेल्या आदिवासींंना उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही.
हे आदिवासी कुक्कुटपालन किंवा बकरी पालनाचा व्यवसाय करतात. मात्र दोन महिन्यांपासून एका समाजकंटकाने आदिवासींच्या बकºयांना लक्ष्य केले आहे. तो झाडाच्या बियांमध्ये विषारी औषध घालून त्या बकºयांना खायला देतो. त्यामुळे बकºया मृत्युमुखी पडत आहेत.
या आदिवासींनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र कारवाई न केल्याने त्या समाजकंटकाने सोमवारी हे कृत्य केले. संतप्त आदिवासींंनी या घटनेची माहिती पशुसंवर्धन विभागाला दिली. मुरबाड पोलिसांनी व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मालती साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.