डिसेंबरच्या २० दिवसात शहरात कोरोनोचे नवे २० रुग्ण, महापालिका आरोग्य यंत्रणेकडून उपाय योजना सुरू

By अजित मांडके | Published: December 20, 2023 04:09 PM2023-12-20T16:09:06+5:302023-12-20T16:09:40+5:30

दुसरीकडे शहरात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेण्याबरोबरच करोना चाचण्या वाढविण्याची तयारी सुरू केली आहे.

20 new corona patients in the Thane city in 20 days of December, the municipal health system has started a solution plan | डिसेंबरच्या २० दिवसात शहरात कोरोनोचे नवे २० रुग्ण, महापालिका आरोग्य यंत्रणेकडून उपाय योजना सुरू

डिसेंबरच्या २० दिवसात शहरात कोरोनोचे नवे २० रुग्ण, महापालिका आरोग्य यंत्रणेकडून उपाय योजना सुरू

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाचा एक नवा रुग्ण आढळला असतांना मागील २० दिवसात कोरोनाचे नवे नऊ रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. देशाते जेएन १ या ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराचा विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. परंतु ठाण्यात लागण झालेल्या रुग्णांच्या नमुने तपासणीचे अहवाल अद्याप पालिकेला प्राप्त झालेले नसल्याने त्यांना नव्या उपप्रकाराची लागण झाले आहे की नाही, हे समजू शकलेले नाही. दुसरीकडे शहरात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेण्याबरोबरच करोना चाचण्या वाढविण्याची तयारी सुरू केली आहे.

ठाणे शहरात मंगळवारी करोनाबाधित रुग्ण आढळून आलेली आहे ती मुळची बिहार राज्यातील आहे. पतीसोबत ती म्हाड येथे आली होती. तेथून ती १५ दिवसांपुर्वी ठाण्यात आली होती. तिला ताप, दमा आणि सर्दी असा त्रास होता. तिचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आलेला असून तिच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाती विशेष कक्षातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दुसरीकडे ठाणे महापालिका हद्दीत मागील दोन वर्षापासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे दिसत होते. त्यातही यंदाच्या मार्च महिन्यात आणि त्यानंतर आॅगस्ट महिन्यात करोनाचे रुग्ण आढळून आले होते. आॅगस्ट महिन्यानंतर मात्र करोना संसर्ग आटोक्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून शहरात करोनाचा रुग्ण आढळून येत नसल्याने पालिका प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला होता. परंतु डिसेंबर महिन्यात करोना आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या २० दिवसांत शहरात ९ करोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी केवळ एका रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. उर्वरित रुग्णांची गृह विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत.

शहरात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. शासनाच्या निदेर्शानुसार शहरातील आरोग्य केंद्र आणि कळवा रुग्णालयात संशयित रुग्णांची करोना चाचणी करण्यात येते. दिवसाला २०० चाचण्या करण्यात येत असून त्यात १२० शीघ्र प्रतिजन तर ८ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येतात. परंतु करोनाची लक्षणे असणाºयांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. तसेच करोनाबाधित रुग्ण उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्यात आलेला आहे. त्याठिकाणी उपचारासाठी एकूण २० खाटा आहेत. त्यातील पाच खाटा अतिदक्षता विभागातील आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दर महिन्याला सुमारे २५ रुग्णांचे नमुने पुणे येथील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविण्यात येतात. डिसेंबर महिन्यात एकूण ९ रुग्ण आढळून आलेले असून त्यापैकी ७ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्याचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना नव्या उपप्रकाराची लागण झाले आहे की नाही, हे समजू शकलेले नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Web Title: 20 new corona patients in the Thane city in 20 days of December, the municipal health system has started a solution plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.