कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे 20 रुग्ण; 2 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:33 PM2020-05-13T18:33:16+5:302020-05-13T18:33:34+5:30

मृतांचा आकडा 7, एकूण रुग्ण संख्या झाली 385

20 new corona patients in Kalyan Dombivali; 2 killed | कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे 20 रुग्ण; 2 जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे 20 रुग्ण; 2 जणांचा मृत्यू

Next

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळून आले आहे. आज दोन कोरोना रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक जण कल्याण पश्चिम व एक जण डोंबिवली पूव्रेतील आहे. यापूर्वी कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला होता. आत्ता कोरोनामुळे मृतांची संख्या 7 झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या 385 झाली आहे.


नव्या 2क् रुग्णांपैकी 6 जण हे डोंबिवली पूव्रेतील आहेत. कल्याण पूव्रेतील 8 जण आहेत. डोंबिवली पश्चिमेतील 2 जण आहेत. कल्याण पश्चिमेतील 2 जण आणि मांडा टिटवाळा परिसरातील एक रुग्णाचा समावेश आहे. या 20 रुग्णांमध्ये चार महिला व 16 पुरुषांचा समावेश आहे.
आत्तार्पयत एकूण उपचार घेत असलेल्या 130 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 248 आहे.

Web Title: 20 new corona patients in Kalyan Dombivali; 2 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.