बैलाच्या झुंजीचे आयोजन करणाºयांसह २० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 09:28 PM2017-12-03T21:28:38+5:302017-12-03T21:34:23+5:30

सोनाळे गावाजवळील नदी किनाºयावरील मोकळया जागेत बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणी आयोजक दिपक किसन पाटील आणि छोट्या सुकºया पाटील यांच्यासह १५ ते २० जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

20 people including organizing bullocks fight | बैलाच्या झुंजीचे आयोजन करणाºयांसह २० जणांवर गुन्हा दाखल

बैलाच्या झुंजीचे आयोजन करणाºयांसह २० जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देसोनाळे गावाच्या नदीकिनारी बैलांच्या झुंजीचे आयोजनप्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखलदोन बैलांसह जीप व टेम्पोे असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवंडी - बैलाच्या झुंजीचे आयोजन करण्यास बंदी असताना तालुक्यातील सोनाळे गावाच्या नदीकिनारी बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्याने तालुका पोलिस ठाण्यात आयोजकांसह १५ ते २० जणांविरोधात प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यात प्रथमच बैलांच्या झुंजी लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने गावकºयांमध्ये संतप्त वातावरण आहे. बैलांच्या झुंजीना बंदी असताना तालुक्यातील सोनाळे गावाजवळील नदी किनाºयावरील मोकळया जागेत बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते.याची माहिती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीसांना मिळताच त्यांनी साध्या वेषांत घटनास्थळी जाऊन मोबाईलमध्ये या झुंजीचे चित्रीकरण केले.त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा ताफा आल्याचे पाहून आयोजकांसह झुंजी लावणाºयांनी पळ काढला.त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून झुंजीसाठी आणलेल्या दोन बैलांसह जीप व टेम्पोे असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आयोजक दिपक किसन पाटील आणि छोट्या सुकºया पाटील यांच्यासह १५ ते २० जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तसेच जप्त केलेले दोन बैल पोलीसांनी आनगाव येथील गोशाळेत जमा केले.पोलीस आयोजक व वाहनमालकाच्या मागावर असुन लवकरच त्यांच्यावर कारवाई करणार आहे,असे पोलीसांनी सांगीतले.

 

Web Title: 20 people including organizing bullocks fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.