माळशेजघाटाच्या हरिचंद्रगडावर रविवारी रात्रीपासून अडकलेल्या २० ट्रेकर्सची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 06:39 PM2018-11-26T18:39:54+5:302018-11-26T18:54:05+5:30

सुटीच्या कालावधीत मुरबाडपासून सुमारे ४० किमी. माळशेज घाटालगतच्या या सह्यादी पर्वत रांगांच्या या कड्यांवर चडण्या - तरण्याचा सराव करण्यासाठी ठिकठिकाणचे ट्रेकर्स येतात. मागील दोन दिवसांच्या सुटीच अनुसरून औरंगाबादसह कल्याण येथील सुमारे २० ट्रेकर्स या हरिचंद्रगडाच्या कड्यावरूनरविवारी उतरण्याचा सराव करीत होते. संध्याकाळपर्यंत ते उतरत असताना त्यांच्याजवळील दोर कमी पडले होते. त्यांचे नियोजन करण्यापर्यंत संध्याकाळ होऊन रात्रीही झाली होती

20 tractors stuck in Harishchandergad in Malshajghat on Sunday night | माळशेजघाटाच्या हरिचंद्रगडावर रविवारी रात्रीपासून अडकलेल्या २० ट्रेकर्सची सुटका

एक हजार फूट उंच कड्यावर औरंगाबादसह कल्याण येथील सुमारे २० ट्रकर्स रविवारी रात्रीपासून आडकले

Next
ठळक मुद्देसंध्याकाळपर्यंत ते उतरत असताना त्यांच्याजवळील दोर कमी पडलेटीम काल रात्रीपासूनच या ट्रेकर्सच्या मदतीला तैनात माळशेज घाटालगतच्या या सह्यादी पर्वत रांगां

ठाणे : सह्याद्रीपर्वताच्या रांगांमधील माळशेज घाटास लागून असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या सुमारे एक हजार फूट उंच कड्यावर औरंगाबादसह कल्याण येथील सुमारे २० ट्रकर्स रविवारी रात्रीपासून आडकले होते. त्यांना एनडीआरएफच्या जवानांसह पोलीस, वन अधिकारी, महसूल विभाग आदींच्या सहकार्याने सोमवारी या सर्व ट्रकर्सना सखरूप खाली तरवण्यात यश आले.
सुटीच्या कालावधीत मुरबाडपासून सुमारे ४० किमी. माळशेज घाटालगतच्या या सह्यादी पर्वत रांगांच्या या कड्यांवर चडण्या - तरण्याचा सराव करण्यासाठी ठिकठिकाणचे ट्रेकर्स येतात. मागील दोन दिवसांच्या सुटीच अनुसरून औरंगाबादसह कल्याण येथील सुमारे २० ट्रेकर्स या हरिचंद्रगडाच्या कड्यावरूनरविवारी उतरण्याचा सराव करीत होते. संध्याकाळपर्यंत ते उतरत असताना त्यांच्याजवळील दोर कमी पडले होते. त्यांचे नियोजन करण्यापर्यंत संध्याकाळ होऊन रात्रीही झाली होती. कोकणकडा येथील सुमारे एक हजार फुट उंचीच्या या कड्यावर हे सर्व ट्रेकर्स अडकले होते. त्यातील १५ जण संध्याकाळी उशिरापर्यंत सुळक्यावरून खाली बेस कॅम्प मध्ये आले आहेत. मात्र हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्याचा सुमारे ५०० मीटर्सचा सुळका उतरायला रविवारी सकाळी सुरु वात केलेल्या सुमारे पाच ट्रेकर्स यांना शेवटचा ३०० मीटर्सचा सुळका आज दुपारी उतरावा लागला. यानंतर सर्वाना टप्प्याटप्प्याने रॅपलिंग करीत सुखरूप खाली उतरवण्यात येश मिळाले.
बेस कॅम्प ज्याठिकाणी आहे तिथे बेलपाडा ही आदिवासी वस्ती आहे. याठिकाणी तहसील कार्यालयाने या ट्रेकर्सची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना नाश्ता , जेवण वगैरे देण्याची व्यवस्था केली. याठिकाणी तालुका अधिकारी डॉ. बनसोडे, निवासी नायब तहसीलदार हनुमंत जगताप, पोलीस निरीक्षक चव्हाण तसेच त्यांची टीम काल रात्रीपासूनच या ट्रेकर्सच्या मदतीला तैनात होती. या बेस कॅम्पपासून वालीव्हरे गावात या ट्रेकर्सना पायीच जावे लागले . सुमारे तीन तासाचे असून नंतर त्या ठिकाणाहून त्यांना मुंबई, ठाणे , मीरा भार्इंदर, कल्याण येथे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आल्याचे मुरबाड तहसिलदार सचिन चवधर यांनी सांगितले. या ट्रेकर्सच्या संपर्कात रात्रीपासून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील आदींसह महसूल अधिकारी होते. या ट्रेकर्सच्या मदतीसाठी नगर , कल्याण, ठाणे येथून काही व्यवसायिक ट्रेकर्स होते. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशांत कापडे यांच्या भटकंती एडव्हेन्चर, सुरेश गिध, शिवदुर्ग या संस्थेचाही सहभाग होता. या अडकलेल्या लोकांत पाच महिलाही होत्या. या सर्व ट्रकर्सना आज वाल्हीवरे येथे सुखरूप आणण्यात आले. यामध्ये कल्याण येथील सात पुरु ष व चा महिला एक गट होता. तर व औरंगाबाद येथील पाच पुरु ष व एक महिला अशा सहा जणांचा एक ट्रेकर्स गट या कोकण कड्याकडून मुरबाड तालुक्यातील वाल्हीवरे गावी येण्यासाठी निघाले असता ते अडकले होते.

Web Title: 20 tractors stuck in Harishchandergad in Malshajghat on Sunday night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.