बलात्कारप्रकरणी २० वर्षांची जन्मठेप, पीडिता दिव्यांग : दोघांना ठोठावली शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:15 AM2017-09-09T03:15:43+5:302017-09-09T03:16:03+5:30
शीळ-डायघर येथील दिव्यांग ११ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणाºया तिघांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुरावे ग्राह्यमानून दोषी ठरवले.
ठाणे : शीळ-डायघर येथील दिव्यांग ११ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणाºया तिघांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुरावे ग्राह्यमानून दोषी ठरवले. तर, यातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. अटकेतील त्या दोघांना शुक्रवारी २० वर्षांपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना १ फेब्रुवारी २०१६ रोजी शीळ-डायघर परिसरात घडली होती.
झारखंड येथील समीन अन्सारी (२१) आणि सोनू मुरम (२२) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. त्यांनी एका साथीदाराच्या मदतीने डोंबिवली-मुंब्रा दरम्यानच्या शीळ-डायघर येथे राहणाºया दिव्यांग ११ वर्षीय मुलगी घराबाहेर खेळत असताना शेजारच्या दुकानातून चॉकलेट विकत घेऊन त्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. तसेच घरापासून काही अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिने विरोध दर्शवल्यावर त्यांनी तिला सिगारेटचे चटके तसेच काठीनेही बेदम मारहाण केली. तसेच नैसर्गिक अत्याचारही केल्याचा आरोप आहे. मुलगी घराबाहेर खेळताना दिसत नसल्याने तिच्या पालकांनी शोध घेतल्यावर ती रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना आढळली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली. त्या वेळी श्वानाने घटनास्थळापासून आरोपी राहत असलेल्या परिसरापर्यंत पोलिसांना आणले. घटनास्थळी सापडलेले चॉकटेलचे आवरण, मारहाण केलेली काठी हस्तगत केली. याप्रकरणी दुसºयाच दिवशी समीन याला अटक केली होती. तर, सोनू हा झाडखंडला पळून गेला होता. त्याला तेथून अटक करण्यात आली.