उल्हासनगरात उभारतंय २०० बेडचे कोविड रुग्णालय, नववर्षात उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 05:35 PM2021-12-31T17:35:18+5:302021-12-31T17:36:21+5:30

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णलाय नसल्याने, कोविड काळात शासकीय प्रस्तुतीगृह रुग्णालय ताब्यात घेऊन, रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले.

200-bed Kovid Hospital under construction in Ulhasnagar, inaugurated in New Year | उल्हासनगरात उभारतंय २०० बेडचे कोविड रुग्णालय, नववर्षात उद्घाटन

उल्हासनगरात उभारतंय २०० बेडचे कोविड रुग्णालय, नववर्षात उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देजाधव यांनी गुरवारी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णलाय उदघाटन साठी सज्ज असल्याची माहिती दिली. रिजेन्सी अंटेलिया येथील कोविड रुग्णालय सुरू झाल्यास, महापालिकेला भाड्याने रुग्णालय घेण्याची वेळ येणार नाही. 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरवासीयांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महापालिकेने रिजेन्सी अंटेलिया येथे २०० बेडचे कोविड रुग्णालय उभारले असून रुग्णालय उदघाटनाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव यांनी दिली. गुरवारी जाधव यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह रुग्णालयाची पाहणी करून, रुग्णालय प्रांगणात ऑक्सीजन प्लॅन्ट उभारला आहे. 

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णलाय नसल्याने, कोविड काळात शासकीय प्रस्तुतीगृह रुग्णालय ताब्यात घेऊन, रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. तसेच शांतीनगर येथे साई प्लॅटिनियम हे खाजगी रुग्णालय दरमहा २० लाख भाड्याने घेतले. या व्यतिरिक्त रेडक्रॉस रुग्णलाय, मध्यवर्ती रुग्णालय येथे कोरोना रुग्णाच्या उपचारा साठी सुविधा उपलब्ध केली. तसेच आयटीआय कॉलेज, वेदांत कॉलेज, तहसिल कार्यालयाची नवीन इमारत, महापालिका अभ्यासिका, महापालिका शाळा आदी ठिकाणी कोविड आरोग्य केंद्र महापालिकेने सुरू केले. या दरम्यान महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी महापालिका रुग्णालयाची संकल्पना मांडून प्रत्यक्षात आणली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव आदींनी रुग्णालय उभारणीसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले.

शहाड गावठाण परिसरातील रिजेन्सी अंटेलिया येथे महापालिकेचे २०० बेडचे कोविड रुग्णालय सज्ज झाले. महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी गेल्या महिन्यात रुग्णालयाची पाहणी करून इतर कामे त्वरित करण्याचे आदेश दिले होते. आजमितीस रुग्णलाय सज्ज असून लवकरच रुग्णालयाचे उदघाटन होऊन शहरवासीयांच्या सेवेत रुग्णालय दाखल होण्याचे संकेत उपायुक्त सुभाष जाधव यांनी दिले. जाधव यांनी गुरवारी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णलाय उदघाटन साठी सज्ज असल्याची माहिती दिली. रिजेन्सी अंटेलिया येथील कोविड रुग्णालय सुरू झाल्यास, महापालिकेला भाड्याने रुग्णालय घेण्याची वेळ येणार नाही. 

रुग्णालयासाठी कोट्यवधींच्या साहित्याची खरेदी महापालिकेच्या रिजेन्सी अंटेलिया येथील रुग्णलायासाठी कोट्यवधी रुपयांचे साहित्य यापूर्वीच खरेदी केले. गेल्या महिन्यात पुन्हा कोट्यवधीचे साहित्य खरेदीला पालिकेने मंजुरी दिली. तसेच रुग्णलाय शेजारी ऑक्सीजन प्लॅन्ट उभारला असून मुबलक प्रमाणात ऑक्सीजन मिळण्याचे संकेत उपायुक्त सुभाष जाधव यांनी दिले.
 

Web Title: 200-bed Kovid Hospital under construction in Ulhasnagar, inaugurated in New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.