ठाण्यात सात दिवसांत आणखी २०० खड्ड्यांची भर; बाप्पांच्या आगमनाला खड्डयांचे विघ्न
By जितेंद्र कालेकर | Published: August 30, 2022 06:47 PM2022-08-30T18:47:51+5:302022-08-30T18:48:53+5:30
लोकमान्यनगर-सावरकर नगर या प्रभाग समितीच्या परिसरात एकही खड्डा भरलेला नाही. याशिवाय इतर प्रभाग समितीतही कुठे शंभर, कुठे दोनशे तर कुठे तीनशे तसेच दिवा प्रभाग समितीत पडलेल्या खड्ड्यांनी ५०० पर्यंत मजल मारली आहे.
ठाणे: आता अवघ्या काही तासांनी विघ्नहर्त्या बाप्पाचे आगमन होणार आहे. मात्र हे आगमन खड्ड्यातूनच होणार असल्याचे चित्र ठाण्यात आहे. महापालिकेच्या प्रभाग समितीअंर्तगत असलेल्या रस्त्यांवर अजून १२२ खड्डे भरणे शिल्लक आहेत. आतापर्यंत महापालिका हद्दीतील रस्त्यांवर एक हजार ६४९ खड्डे पडले असून एक हजार ५१७ खड्ड्यांची मलमपट्टी केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र गेल्या सात दिवसात ठाणे शहरात नवे सुमारे २०० खड्डे वाढल्याची आकडेवारी समाेर आली आहे.
लोकमान्यनगर-सावरकर नगर या प्रभाग समितीच्या परिसरात एकही खड्डा भरलेला नाही. याशिवाय इतर प्रभाग समितीतही कुठे शंभर, कुठे दोनशे तर कुठे तीनशे तसेच दिवा प्रभाग समितीत पडलेल्या खड्ड्यांनी ५०० पर्यंत मजल मारली आहे.
पावसाळा सुरु झाल्यानंतर शहरातील विविध भागातील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात हाेते. पावसाळ्यापूर्वीच ठाणे महापालिकेने एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणांची बैठक घेऊन संबंिधतांनी आपआपल्या मालकीच्या रस्त्यावरील खड्डे बुज िवण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतरही महापा िलका हद्दीतही शहराच्या विविध भागात खड्डे पडल्याची बाब समोर आली आहे. त्यातही इतर प्राधिकरणाबरोबर महापालिका हद्दीत देखील खड्ड्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसात समाेर आले आहे. आतापर्यंत पावसामुळे खड्ड्यांची ही संख्या एक हजार ६४९ एवढी झाल्याची बाब समाेर आली आहे.
प्रभाग समिती - पडलेले खड्डे - बुजविलेले खड्डे - शिल्लक खड्डे
दिवा - ४८९ - ४५४ - २५
वर्तकनगर - ३२० - ३०० - २०
उथळसर - १४१ - १३६ - ०५
नौपाडा कोपरी - १०६ - ९८ - ८
वागळे - १६७ - १५१ - १७
कळवा - २५० - २४४ - ०६
मुंब्रा - ४७ - ३० - १७
माजीवडा मानपाडा- ११६ - १०४ - १२
लोकमान्य सावरकर- १२ - ०० - १२
एकूण - १६४९ - १५१७ - १२२