तंबाखूसेवनातून २०० जणांची मुक्ती, ५० शाळा झाल्या तंबाखूमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 01:43 AM2019-05-31T01:43:12+5:302019-05-31T01:43:25+5:30

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम २०१२ पासून ठाणे जिल्ह्यात राबवला जात आहे.

200 people get rid of tobacco usage and become 50 schools without tobacco free | तंबाखूसेवनातून २०० जणांची मुक्ती, ५० शाळा झाल्या तंबाखूमुक्त

तंबाखूसेवनातून २०० जणांची मुक्ती, ५० शाळा झाल्या तंबाखूमुक्त

googlenewsNext

पंकज रोडेकर

ठाणे : ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यालयांतर्गत गेल्या वर्षभरात उपचारार्थ आलेल्या चार हजार नागरिकांपैकी २०० जणांची तंबाखूसेवनातून मुक्ती करण्यात ठाणे जिल्हा आरोग्य प्रशासनाला यश आले आहे. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५० शाळाही तंबाखूमुक्त शाळा म्हणून नावरूपास आल्या आहेत. त्याचबरोबर घेतलेल्या शिबिरांमध्ये नऊ जणांना तोंडाचे कर्करोग झाल्याची माहिती जागतिक तंबाखू नकार दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम २०१२ पासून ठाणे जिल्ह्यात राबवला जात आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ८९ प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाले आहेत. त्यात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणातून जिल्हा तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. ही मोहीम शाळेपासून थेट सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे सेवन करणारे तसेच धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्यापर्यंत राबवली जात असल्याची माहिती जिल्हा दंतशल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली.

दोन लाखांची कारवाई
रुग्णालय, पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यानुसार, एक हजार ११४ जणांवर कारवाई करत दोन लाख दोन हजार ६७० रुपये इतका दंड आकारण्यात आला.

वर्षभरात १०७ शिबिरे
वर्षभर राबवलेल्या १०७ शिबिरांत तंबाखूचे सेवन करणाºयांची तपासणी केली. यामध्ये काही संशयित आढळले. नऊ जणांना तोंडाचा कर्करोग झाला.

जिल्ह्यात १० मुक्ती केंदे्र
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयासह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय, टोकावडे,अंबाडी,भिवंडी,मुरबाड,शहापूर, गोवेली,बदलापूर, मालवणी अशी मुक्ती केंद्रे आहेत.

Web Title: 200 people get rid of tobacco usage and become 50 schools without tobacco free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे