कळवा रुग्णालयात महिनाभरात दगावली २१ नवजात बालके

By अजित मांडके | Published: July 5, 2024 05:51 PM2024-07-05T17:51:12+5:302024-07-05T17:51:28+5:30

ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे.

21 newborns died in Kalwa hospital within a month | कळवा रुग्णालयात महिनाभरात दगावली २१ नवजात बालके

कळवा रुग्णालयात महिनाभरात दगावली २१ नवजात बालके

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील वर्षी एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच आता मागील महिनाभरात याच रुग्णालयात नवजात २१ बालके दगावल्याची माहिती समोर आली आहे.  या नवजात बालकांचे वजन कमी असल्यानेच त्यांचा मृत्यु झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात एकाच दिवशी तब्बल १८ रुग्णांचा मृत्यु झाल्याने हे रुग्णालय अधिकच चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एका महिन्यात तब्बल २१ नवजात बालके मृत्यु झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु या घटनेनंतर कळवा रुग्णालयाच ताण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले होते. परंतु त्यानंतरही आजही रुग्णालय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 
रुग्णालयाचा ताण आजही कमी झाला नसल्याचेच दिसून आले आहे. रुग्णालयात ५०० खाटा आहेत. तर रोजच्या रोज या रुग्णालयात ४५० हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. तर लहान मुलांसाठी अतिदक्षता विभागात सध्या एनआयसीयूमध्ये 30 खाटा आहेत, त्यातील 20 खाटा रुग्णालयातील प्रसूतीसाठी नोंदणी झालेल्या महिलांसाठी राखीव आहेत तर इतर दहा ठाणे, पालघर आणि इतर आदिवासी भागातील रुग्णांचा भार हाताळण्यासाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, रुग्णालयात गेल्या जून महिन्यात ठाणे व पालघर जिल्ह्यातील ५१२ महिला प्रसूती साठी दाखल झाल्या होत्या.त्यातील ९० प्रसूती महिलांची नोंदणी ही रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलांची आहे. तर उर्वरीत इतर जिल्ह्यातील होत्या त्यातील २९४ या सिझरिन प्रसूती होत्या. त्यातील प्रसूती झालेल्या महिला रूग्ण पैकी ८ नवजात बालकांचा ४८ तासांत मृत्यू झाला होता. तर पूर्ण जून महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यु झाल्याचे दिसून आले आहे. 

जून महिन्यात मृत्यू झालेल्या २१ मुलांचे वजन दीड किलो पेक्षा कमी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकूडन देण्यात आली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती असलेल्या प्रसूतीसाठी महिला दाखल झाल्या होत्या ९० नवजात शिशुचे वजन १ किलो वजनापेक्षा कमी होते. २१ पैकी १९ हे बाहेरचे बालक हे बाहेरचे होते त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.

या प्रकरणाचा अहवाल रुग्णालय प्रशासनाचे डीन डॉ. राकेश बारोट यांच्याकडून मागविण्यात आला आहे. मृत्यु पावलेल्या नवजात बालकांचे वजन हे दिड किलो पेक्षा कमी असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. परंतु आता याची चौकशी केली जाईल,आणि याचा अहवाल हा सभागृहसमोर सादर केला जाईल.
- उमेश बिरारी - उपायुक्त, ठामपा

Web Title: 21 newborns died in Kalwa hospital within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.