ठाणे जिल्ह्यात २१ माध्यमिक शाळा अनधिकृत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 04:26 AM2018-06-16T04:26:31+5:302018-06-16T04:26:31+5:30

जिल्ह्यात मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमांच्या मिळून एकूण २१ अनधिकृत माध्यमिक विभागाच्या शाळा असून या शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.

21 secondary schools in Thane district are unauthorized | ठाणे जिल्ह्यात २१ माध्यमिक शाळा अनधिकृत  

ठाणे जिल्ह्यात २१ माध्यमिक शाळा अनधिकृत  

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यात मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमांच्या मिळून एकूण २१ अनधिकृत माध्यमिक विभागाच्या शाळा असून या शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे. तसेच संस्थाचालकांनी अशा अनधिकृत माध्यमिक शाळा तत्काळ बंद न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
२०१७-१८ मधील युडायस रिपोर्टनुसार ठाणे जिल्हा परिषदेंतर्गत सुमारे २१ अनधिकृत माध्यमिक शाळा सुरू आहेत. यात ठाणे शहरातील ८, नवी मुंबईतील ५, कल्याणमधील ४, अंबरनाथमधील ३ आणि मीरा-भार्इंदरमधील एका शाळेचा समावेश आहे. ठाण्यातील नालंदा विद्यालय, आदर्श विद्यालय सेकंडरी, अरुणज्योत विद्यालय, आरक्वॉम इस्लामिक विद्यालय, रफिक इंग्रजी विद्यालय, स्टार इंग्रजी विद्यालय, होली मारिया कॉन्व्हेंट इंग्रजी विद्यालय, आतमन अ‍ॅकॅडमी या आठ शाळा आहेत. नवी मुंबईतील भारतीय जागरण इंग्रजी सेकंडरी विद्यालय, श्री साईज्योती सेकंडरी विद्यालय कोपरखैरणे, अल मुमिनाह सेकंडरी विद्यालय बेलापूर, ज्ञानदीप सेवा मंडळ इंग्रजी सेकंडरी विद्यालय, विद्या उत्कर्ष मंडळ इंग्रजी विद्यालय बेलापूर यांचा समावेश आहे. या शाळांच्या संस्थाचालकांनी अनधिकृत शाळा आणि वर्ग तत्काळ बंद करावे असे आदेश दिले आहेत.

कल्याण, अंबरनाथच्या शाळांचा समावेश

कल्याण येथील आदर्श विद्यालय, लोढा (हिंदी), आदर्श विद्यालय, लोढा (मराठी), आदर्श विद्यालय, लोढा (इंग्रजी) आणि पोदार इंटरनॅशनल विद्यालय या चार शाळा आहेत. स्वामी समर्थ हायस्कूल, प्रगती विद्यामंदिर आणि नवभारत इंग्रजी विद्यालय या अंबरनाथमधील तर, प्रशिक स्पेशल (मराठी) विद्यालय ही मीरा-भार्इंदरमधील शाळा आहे. मराठी ४, हिंदी माध्यमाच्या ४ आणि इंग्रजी माध्यमाच्या १३ शाळा आहेत.

Web Title: 21 secondary schools in Thane district are unauthorized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.