भिवंडी शहरात २१ अनधिकृत शाळा; अवैध शाळेत प्रवेश न घेण्याचे पालकांना पालिकेचे आवाहन
By नितीन पंडित | Published: June 14, 2024 05:52 PM2024-06-14T17:52:30+5:302024-06-14T17:52:36+5:30
अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन शहरातील नागरिकांना आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.
भिवंडी: महानगरपालिका क्षेत्रात तब्बल २१ प्राथमिक शाळा या अनधिकृत असल्याची माहिती पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकरी उपेंद्र संबारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन शहरातील नागरिकांना आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे. विशेष म्हणजे मागील शैक्षणिक वर्षात शहरात १६ अनधिकृत शाळा होत्या त्यामध्ये यावर्षी ५ शाळांची वाढ झाली आहे. तर अशा अनधिकृत शाळांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शहरातील अनधिकृत शाळांची यादी
१) झम झम मकतब आणि शाळा, भिवंडी, जि. ठाणे, रावजी नगर, नवी वस्ती कल्याण रोड,
२) डॉ.ए.पी जे अब्दुल कलाम इंग्रजी शाळा,रावजी नगर,नवी वस्ती कल्याण रोड,
३) रॉयल इंग्रजी शाळा,पटेल कंपाऊंड, धामणरकर नाका,
४) नोबेल इंग्रजी शाळा अवचीतपाडा,
५) अल रजा उर्दु प्राथमिक शाळा,अमजदिया रोड, खान कंपाऊंड,गैबीनगर
६) मराठी प्राथमिक शाळा, पाईप लाईन शेजारी,टेमघर,
७) इंग्लीश प्राथमिक,माध्यमिक शाळा, पाईप लाईन शेजारी,टेमघर,
८) द लर्निंग प्राथमिक शाळा,टेमघर पाडा,भादवड,
९ )एकता इंग्रजी पब्लीक शाळा,फातमा नगर,गायत्रीनगर,
१०) एकता उर्दु पब्लीक शाळा,
फातमानगर, गायत्रीनगर,
११) ए. आर रहेमान उर्दू प्राथमिक शाळा,
फातमानगर,नागांव,
१२) झवेरीया उर्दु प्राथमिक शाळा,गैबीनगर,
१३) विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा,
नवीवस्ती कल्याण रोड,
१४) सरस्वती इंग्रजी शाळा, नवीवस्ती,गौतम कम्पाऊंड,
१५) अल हिदाया पब्लीक प्राथमिक शाळा,पटेल नगर, बाळा कम्पाऊंड,
१६) तहजीब इंग्रजी प्राथमिक शाळा,चिंहीशाह दर्गा जवळ,जैतनुपुरा,
१७) इकरा इसलामिक शाळा मेट्रो होट्रेल, नदिनाका,
१८) कैसर बेगम इंग्रजी शाळा, सागर प्लाझा हॉटेल समोर,नागांव,
१९) अल फलक मकतब आणि इंग्रजी प्राथमिक शाळा,खजुरपुरा,
२०) फरहान इंग्रजी प्राथमिक शाळा, दर्गा रोड
२१) गितांजली इंग्रजी माध्यमिक शाळा,पद्मानगर,व-हाळ देवी रोड,