‘साईराज’च्या १६१ विस्थापित कुटुंबांचा २१ वर्षांचा वनवास संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 05:31 AM2019-08-29T05:31:24+5:302019-08-29T05:31:30+5:30

कोलशेत येथे मिळणार वनविभागाची जागा : नगरविकास विभागाने हरकती व सूचना मागविल्या

21 year residence of 161 displaced families of Sairaj will end | ‘साईराज’च्या १६१ विस्थापित कुटुंबांचा २१ वर्षांचा वनवास संपणार

‘साईराज’च्या १६१ विस्थापित कुटुंबांचा २१ वर्षांचा वनवास संपणार

Next

नारायण जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोलशेत येथील वनविभागाच्या मालकीचा ५०५०.०४ चौरस मीटरचा भूखंड रहिवास विभागात समावेश करण्यास नगरविकास विभागाने २३ आॅगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे ठाण्यातील वागळे इस्टेट येथील दुर्घटनाग्रस्त साईराज इमारतीमधील विस्थापित १६१ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या २१ वर्षांपासून या कुटुंबांचे पुनर्वसन रखडले होते. मात्र, आता हा भूखंड वनविभागावरून रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.


१९९८ साली वागळे इस्टेट भागातील साईराज इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला होता, तर १६१ कुटुंबे विस्थापित झाली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी साईराजनजीकच्या इतर पाच इमारतीही धोकादायक ठरवून तेथील रहिवाशांची घरे खाली केली करून त्यांना लवकरच मोफत घरे किंवा जागा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आजपर्यंत मिळालेले नाही.


या विस्थापितांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या ‘स्वामी समर्थ को-आॅप. हाउसिंग सोसायटी’साठी कोलशेत येथे जागा देण्यात आली होती. मात्र, सरकारच्या मालकीची ही जागा परस्पर मूळ मालकाला परत करण्यात आल्याने साईराज इमारतीच्या विस्थापितांना आजपर्यंत भूखंड मिळालेला नव्हता. शासनाने जागा दिल्यानंतर या विस्थापितांनी त्यासाठी ७६ लाख रु पये भरले होते. मात्र, अजूनही ती जागा त्यांना मिळालेली नव्हती. २००८ मध्ये ही जमीन पुनर्वसनासाठी दिलेली होती. मात्र, याविरोधात जागेचा मूळ मालक उच्च न्यायालयात गेला होता. त्यावर या जमीन हस्तांतरणास न्यायालयाने स्थगिती दिली होती. तेव्हापासून हे विस्थापित हक्काच्या घरासाठी जागेच्या शोधात होते. मधल्या काळात या रहिवाशांना २००२ साली ठाणे महापालिकेने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रेंटल हाउसिंगच्या संक्रमण शिबिरात हलवले होते. तेव्हापासून ते तेथेच राहत आहेत.

रोमा बिल्डरच्या
जागेतून होणार ये-जा

आता नगरविकास विभागाने वनविभागाच्या विनंतीवरून त्यांच्या मालकीचा कोलशेत येथील सिटी सर्व्हे क्रमांक २०२/८५ वरील ५०५०.०४ चौरस मीटरचा भूखंड रहिवासी क्षेत्रास मान्यता दिली आहे. याशिवाय, या रहिवाशांंना कोलशेतच्याच सिटी सर्व्हे १४७/१ या रोमा बिल्डरच्या मालकीच्या भूखंडावरून येजा करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत, असे सूचित केले आहे.

बिल्डर, वास्तुविशारदास तीन वर्षांची शिक्षा
मधल्या काळात ठाणे न्यायालयाने फेबु्रवारी २०१८ मध्ये साईराज इमारत दुर्घटनेप्रकरणी तिचा बिल्डर शरदभाई मानसिंग पवार आणि आर्किटेकट आनंद अष्टपुत्रे यांना दोषी ठरवून तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तर, उर्वरित किमान तीन महिलांसह सुमारे अर्धा डझन आरोपींना दोषमुक्त केले होते.

च्जागा दिल्यानंतर या विस्थापितांनी त्यासाठी ७६ लाख रु पये भरले होते. मात्र, अजूनही ती जागा त्यांना मिळालेली नव्हती.
च्२००८ मध्ये ही जमीन पुनर्वसनासाठी दिलेली होती. मात्र, याविरोधात जागेचा मूळ मालक उच्च न्यायालयात गेला होता.

Web Title: 21 year residence of 161 displaced families of Sairaj will end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.