कल्याण-डोंबिवलीत वादळामुळे पडली २१० झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:41 AM2021-05-19T04:41:40+5:302021-05-19T04:41:40+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना वादळी वाऱ्याचा सोमवारी (दि. १७) चांगलाच तडाखा बसला. त्यामुळे शहरातील २१० झाडे पडली असून, १३ ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना वादळी वाऱ्याचा सोमवारी (दि. १७) चांगलाच तडाखा बसला. त्यामुळे शहरातील २१० झाडे पडली असून, १३ घरे आणि आठ गाड्यांचे नुकसान झाले.
सोसाट्याच्या वारा सुटल्याने झाडे पडल्याच्या घटना एकापाठोपाठ घडू लागल्या. अग्निशमन दलाने अनेक ठिकाणी धाव घेऊन झाडे हटविण्याचे काम केले. मात्र, सगळ्य़ाच ठिकाणची झाडे हटविणे जिकिरीचे होते. त्यामुळे मंगळवारीही अनेक ठिकाणी झाडे हटविण्याचे काम सुरू होते. २१० ठिकाणी झाडे पडल्याची माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली.
दरम्यान, वादळी वाऱ्याचा फटका कल्याण पूर्वेतील एका अपंग व्यक्तीलाही बसला आहे. जिम्मी बागेतील एस. एस. चंद्रिकापुरे चाळीत राहणारे विजय वाघमारे यांच्या घराचे छप्पर तुटून भिंती पडल्या आहेत. या घटनेत वाघमारे थोडक्यात बचावले आहेत. ही नैसर्गिक आपत्ती असल्याने नुकसान झालेल्या घरमालकांना नुकसान भरपाई दिली जावी. त्यांच्या घरांचा पंचनामा तहसील कार्यालयाकडून केला जावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली आहे.
---------------