२२ शाळा अनधिकृत प्रत्येकी लाखाचा दंड
By admin | Published: March 14, 2016 01:39 AM2016-03-14T01:39:35+5:302016-03-14T01:39:35+5:30
शिक्षण विभागाने पालघर जिल्ह्यातील २२ माध्यमिक शाळा अनधिकृत ठरवल्या असून त्या तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत
पालघर : शिक्षण विभागाने पालघर जिल्ह्यातील २२ माध्यमिक शाळा अनधिकृत ठरवल्या असून त्या तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या शाळांना प्रत्येकी एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला असून तो सात दिवसाच्या आत भरण्याचेही आदेशिले आहे.
शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या मुदतीत शाळा बंद न केल्यास प्रत्येक दिवसासाठी १० हजाराचा दंड आकारण्यात येईल अशी ताकीद ही या शाळांना देण्यात आली आहे. या अनधिकृत ठरलेल्या शाळांमध्ये पालघर तालुक्यातील सर्वाधिक १५ शाळा असून वाडा व जव्हार तालुक्यात प्रत्येकी ३ व विक्रममडमधील १ शाळेचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्य) शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. आता हा आदेश पाळला जातो की नाही याकडे लक्ष लागले आहे.पालघर तालुका : वेणूबाई पाटील (धुकटण), दुर्वेस विद्या (दुर्वेस), आदर्श विद्या (महागाव), मिरॅकल इंग्रजी माध्य (नवापूर), सानेगुरुजी विद्या (घाटीत), मातोश्री आशादेवी हाय (बोईसर), टी.आर.पी इंग्रजी स्कुल (बोईसर), न्यू नॅशनल हाय (बोईसर)सभापती मेमो. हाय (बोईसर), फला ए दाऊत उर्दू हायस्कूल (बोईसर), मदर वेलाकंत इंट, (कुरगाव,), बोईसर पब्लिक स्कूल (सालवड), लिटिल फ्लॉवर इंग्रजी (पंचाली), लिटिल एंजल विद्यालय (दांडी), स्वामी विवेकानंद (रोठे).