जीवावर उदार होऊन ठाण्यात २२० कोरोना योद्धे करताहेत औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 04:53 PM2020-04-23T16:53:23+5:302020-04-23T16:56:00+5:30

अत्यावश्यक सेवेत असलेल्या २२० कर्मचारी फवारणीचे काम सध्या ठाण्यात करीत ाहेत. आपला जीव जोखमीत टाकून त्यांच्याकडून हे कार्य सुरु आहे. यामध्ये हंगामी स्वरुपाच्या कामगारांचाही समावेश आहे.

220 Corona warriors are spraying drugs in Thane | जीवावर उदार होऊन ठाण्यात २२० कोरोना योद्धे करताहेत औषध फवारणी

जीवावर उदार होऊन ठाण्यात २२० कोरोना योद्धे करताहेत औषध फवारणी

Next

ठाणे : तात्काळ कामावर हजार व्हा, अमुक अमुक ठिकाणी फवारणी कारायची आहे. असा ठेकदाराचा फोन येताच हंगामी कामगार म्हणून भरती झालेला कामगार सोबत संरक्षण किट आणि औषध फवारणीचा टँक घेऊन कर्तव्यावर हजर होतात. मग ठेकेदार सांगेल त्या कोरोना बाधित रु ग्णाच्या परिसरात, गल्लीबोळात, घरात फवारणी करतात. ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रात असे ७० हंगामी आणि १५० कायमस्वरूपी कामगार ठाणे शहर कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.
                  कळवा, मुंब्रा डेंजर झोनमध्ये आल्यानंतर ठाणे महानगर पालिका आरोग्य विभाग अधिक सर्तक झाला आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून जंतुनाशक औषधांची फवारणी करणार्या फायलेरिया विभागामार्फत कोरोना बाधित परिसरात मोठ्या प्रमाणात फवारणी केली जात आहे. रस्त्यांवर अग्निशमन दलाच्या मदतीने यंत्राच्या सहाय्याने फवारणी केली जात आहे. तर झोपडपट्टी, सोसायट्या आणि कोरोना बाधित रु ग्णाच्या घराशेजारी कामगारांच्या माध्यमातून फवारणी केली जात आहे. पालिकेकडे सुमारे १५० कामगार कायमस्वरूपी शहरात फवारणीचे काम करत असतात. तर पावसाळ्यात रोगराई वाढत असल्याने चार महिन्यांसाठी हंगामी तत्वावर तात्पुरत्या कामगारांची ठेकेदारी पद्धतीवर भरती केली जाते. शहरात अशा प्रकारचे सुमारे ७० कामगार हे काम करत आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाचे पॉझटिव्ह रु ग्ण आढळून येतात, त्या ठिकाणचा परिसर निर्जंतुक करण्यासाठी या कामगारांना पाठविले जाते. ठेकेदाराकडून त्यांना अंगावर परिधान करणारा सूट, हातमोजे, मास्क, सॅनिटाइझर पुरविले जाते. मात्र ठेकेदाराकडून अवघा १२ हजार रु पये पगार दिला जातो. पगाराच्या कोर्या रजिस्टरवर कामगारांच्या सह्या घेतल्या जातात. कामगार विमा रु ग्णालयाचे पैसे कापले जात असतानाही गेल्या चार वर्षांपासून अद्याप त्यांना कामगार रु ग्णालयाच्या सुविधा मिळालेल्या नाहीत. गेल्या दिवाळीचा बोनस आणि गेल्या महिन्याचा पगार देखील अद्याप दिला गेला नसल्याचा आरोप हे हंगामी कामगार करत आहेत. ठेकेदार सांगेल त्या वेळेला, अगदी जेवता जेवताही फवारणीसाठी यावे लागते. असेही कामगारांचे म्हणणे आहे. हंगामी कांमगारांना अशा कितीही अडचणी असल्या तरीदेखील ते ठाणेकरांचे आरोग्य बोघडू नये म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून औषधांची फावरणी करत आहेत.


  • मुंबईतच्या धर्तीवर ठाण्यातील या कामगारांना देखील ३०० रु पयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जावा. त्यांची वेळोवेळी तपासणी केली जावी. एखादा कोरोना बाधित झाला तर तीन मिहने त्याला भरपगारी रजा दयावी. कोरोना संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला पालिकेत नोकरी आणि एक कोटी रु पये द्यावेत.

- चेतन आंबोणकर, चिटणीस, मूनिसपल लेबर युनियन
 

Web Title: 220 Corona warriors are spraying drugs in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.