ठाणे सिव्हीलसह जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक पध्दतीने करण्यात आल्या डोळ्यांच्या २२०० शस्त्रक्रिया!

By सुरेश लोखंडे | Published: December 26, 2023 06:36 PM2023-12-26T18:36:51+5:302023-12-26T18:37:46+5:30

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दोन हजाराहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे.

2200 eye surgeries were done in Thane civil and district government hospitals | ठाणे सिव्हीलसह जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक पध्दतीने करण्यात आल्या डोळ्यांच्या २२०० शस्त्रक्रिया!

ठाणे सिव्हीलसह जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक पध्दतीने करण्यात आल्या डोळ्यांच्या २२०० शस्त्रक्रिया!

ठाणे : येथील ठाणे सिव्हील रुग्णालयात डोळ्यांशी संबंधित काही महागड्या शस्त्रक्रिया अत्याधुनिक पध्दतीने मशीनच्या साहाय्याने पार पडत आहेत. गेल्या सहा महिन्यात डोळ्यांतील मोतीबिंदूच्या १५० तर डोळ्याच्या लहान सहान शस्त्रक्रिया माेठ्याप्रमाणात यशस्वीपणे पार पडल्या आहेत. तर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दोन हजाराहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे.

वागळे इस्टेट येथील आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपाचे सिव्हील रुग्णालयाची उभारणी केली आहे. मात्र रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. रुग्णालयात नेत्र विभागासाठी तीन मजली स्वतंत्र दालन तयार केले आहे. या ठिकाणी नेत्र चिकित्सा करण्यासाठी अद्यावत यंत्रणा असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदरशनाखाली जून ते डिसेंबर या काळात मोतीबिंदू १५० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर जिल्ह्यातील उप जिल्हा, ग्रामीण आदी सरकारी रुग्णालयात दोन हजारावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. अशी माहिती नेत्र तज्ज्ञ डॉ.शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.

चष्म्याचा अचूक नंबर काढण्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात सुसज्य मशीन आणल्या आहेत. खाजगी रुग्णालयात नेत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रियेसाठी हजारो रुपये मोजावे लागतात. मात्र येथील सिव्हील व जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया मोफत होत आहेत. डोळ्याचा अचूक नंबर काढण्यासाठी आय.ओ. एल. मास्टर मशीन, लेन्स मधील मागचे जाळे काढण्यासाठी याग लेजर मशीन, रेटीना आजार तपासण्यासाठी ओसीटी, अशा आधुनिक तंत्राच्या मशिंनमध्ये रुग्णांच्या डोळ्याची तपासणी होत असल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. विक्रम काकडे म्हणाले.

शरीराच्या नाजूक भागापैकी एक असणाऱ्या डोळ्यांसाठी रुग्णालयात रुग्णाला चागली सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. रेटिना, काचबिंदू, मोतीबिंदू, डोळ्यांची नस तपासणी इत्यादीची सोय करण्यात आली आहे. रुग्णालयात नेत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामुग्री पुरवण्यात आली आहे.
डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्यचिकित्सक)
 

Web Title: 2200 eye surgeries were done in Thane civil and district government hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.