उल्हासनगर शिवसेनेची २२००० सभासद नोंदणी; १०,००० पेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र पाठवली
By सदानंद नाईक | Published: August 27, 2022 04:04 PM2022-08-27T16:04:32+5:302022-08-27T16:04:46+5:30
उल्हासनगर शिवसेनेला पूर्वीचे वैभव आणण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून दोन महिन्यात २२ हजार सभासद नोंदणी केल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर शिवसेनेने २२ हजारा पेक्षा जास्त सदस्य नोंदणी केली असून पक्ष पदाधिकाऱ्यांचे १० हजार प्रतिज्ञापत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. तसेच शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, महिला पदाधिकारी यांच्या नव्याने नियुक्त्या केल्या जात आहेत. असे चौधरी म्हणाले.
उल्हासनगर शिवसेनेला पूर्वीचे वैभव आणण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून दोन महिन्यात २२ हजार सभासद नोंदणी केल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. तसेच शिवसेना सोडून गेलेल्याच्या जागी नवीन पदाधिकार्यांची निवड सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. काही दिवसात महिला आघाडीच्या नव्याने नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे चौधरी म्हणाले. गेल्या महिन्यात १० हजार पेक्षा जास्त पदाधिकारी, माजी नगरसेवक व शिवसैनिकांचे प्रतिज्ञापत्र पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले असून शिवसेना कधीनव्हे ते कार्यशील झाल्याचे चौधरी म्हणाले.
महापालिकेवर सर्वाधिक कालावधी साठी शिवसेना सत्तेत राहिली आहे. दरम्यान शिवसेनेतील माजी नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गट मध्ये प्रवेश केल्याने, शिवसेनेत उभी फूट पडली आहे. कॅम्प नं-५ येथे शिवसेना महिला मेळावा संपन्न झाला असून शिवसेना उपशहरप्रमुख मुकेश तेजी, विभागप्रमुख लाल्या कुंचे, मधुकर साबळे आदींनी मार्गदर्शन केले. तसेच परिसरातील एका शिवसेना शाखेवर शिंदे गटाने हक्क सांगण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे कुंचे यांनी यावेळी सांगितले. शहरात शिवसेना नव्याने उभारत असून महिला वर्गाचा सर्वाधिक पाठिंबा पक्षाला मिळत असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.