९९४ जागांसाठी २,२३१ हजार उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:17 AM2021-01-06T00:17:37+5:302021-01-06T00:17:47+5:30

१५ जानेवारी रोजी मतदान : १८ जानेवारीला होणार उमेदवारांचा फैसला

2,231 candidates are in the fray for 994 seats | ९९४ जागांसाठी २,२३१ हजार उमेदवार रिंगणात

९९४ जागांसाठी २,२३१ हजार उमेदवार रिंगणात

Next

- सुरेश लाेखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी चार हजार ३८८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता ९९४ सदस्यांसाठी उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यासाठी दोन हजार २३१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून १५ जानेवारीला मतदान होणार आहे.


 ठाणे तालुक्यातील नवी मुंबई मनपातून वगळलेल्या १४ गावांच्या पाच ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या ग्रामपंचायतींच्या ५१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. या गावांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे तेथे निवडणूक होणार नाही. याशिवाय आठ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.


    मुरबाड तालुक्यातील १६० जागांसाठी ३४१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येथील ४६ प्रभागांतील १७८ सदस्यांसह पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता ३९ ग्रामपंचायतींच्या १६० जागांसाठी ८७ प्रभागांत ३४१ जणांचा प्रचार रंगणार आहे. कल्याण तालुक्यातील एक ग्रामपंचायत बिनविरोध विजयी ठरली आहे. यासह तब्बल ४४ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आता या तालुक्यात २० ग्रामपंचायतींच्या १६७ सदस्यांच्या निवडीसाठी ३८१ जण निवडणूक रिंगणात आहेत.


 भिवंडीला सर्वांत जास्त ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यातील तीन ग्रामपंचायतींसह एकूण १०८ सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. आता ५३ ग्रामपंचायतींच्या ४६३ सदस्यांसाठी प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. यासाठी एक हजार ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात 
आहेत. 


अंबरनाथ तालुक्यात २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. यातील नऊ सदस्यांची एक ग्रामपंचायत बिनविरोध ठरली आहे. येथे आता २६ ग्रामपंचायतींच्या १७२ सदस्यांसाठी मतदान होणार आहे. यासाठी ३७५ उमेदवार रिंगणात आहेत. 
सदस्यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे तब्बल ६९ जणांचा बिनविरोध विजय झाला 
आहे. 
शहापूरला पाच ग्रामपंचायतींच्या ३२ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी ७१ जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर १९ जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.


टॉपच्या तीन ग्रामपंचायती
जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील म्हारळ तर भिवंडीमधील काल्हेर व दिवे अंजूर या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर रंगणार आहे. भिवंडीच्या या दोन ग्रामपंचायती गोडाऊन पट्ट्यातील जादा महसूल देणाऱ्या आहेत. याशिवाय काल्हेरच्या परिसरात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. याशिवाय दिवे अंजूर हे भाजप खासदार कपिल पाटील यांचे गाव आहे. यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात गावातील मातब्बर उतरले आहेत. लोकसंख्येसह मतदार सर्वाधिक असलेल्या या ग्रामपंचायत क्षेत्राला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे. याशिवाय औद्योगिक क्षेत्रही या ग्रामपंचायत क्षेत्रात असल्यामुळे महसूल दृष्टिकोनातून या ग्रामपंचायती श्रीमंत आहेत. त्यामुळे या निवडणुकीलाही या ग्रामपंचायती राजकीय पक्ष प्रतिष्ठेच्या करण्याच्या प्रयत्नात आहेत.

राजकीय वातावरण तापले
nयेत्या १५ जानेवारी राेजी ग्रामपंचायतीच्या निवडणुका हाेणार असून काही ठिकाणी बिनविराेध ग्रामपंचायती झाल्या असून ज्या ठिकाणी निवडणूक हाेणार आहे तेथील वातावरण सध्या तापलेले आहे.
nग्रामपंचायतीवर काेणाची सत्ता येणार यावरुन गावागावांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. राजकीय पक्षांचेही याकडे लक्ष लागले आहे.

 जिल्ह्याचे लक्ष असलेली ग्रामपंचायत 
जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून म्हारळगाव या ग्रामपंचायतीकडे पाहिले जात आहे. कल्याण पंचायत समितीच्या नियंत्रणातील ही ग्रामपंचायत कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर आहे. याशिवाय या गावात मोठमोठ्या विकासकांचे हाउसिंग प्रकल्प सुरू आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या कार्यक्षेत्राला हे गाव लागून आहे. त्यामुळे उद्योगधंदे व राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून या गावाकडे पाहिले जात आहे.

Web Title: 2,231 candidates are in the fray for 994 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.