ठाणे जिल्ह्यात २३ कोरोनाबाधितांनी गमावला जीव; ४२२ नवे रुग्ण सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:45 AM2020-06-04T05:45:03+5:302020-06-04T05:45:13+5:30

जिल्ह्यात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. बुधवारी या महापालिका हद्दीत १४९ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या तीन हजार ४४९ झाली आहे.

23 corona victims lose their lives in Thane district; 422 new patients were found | ठाणे जिल्ह्यात २३ कोरोनाबाधितांनी गमावला जीव; ४२२ नवे रुग्ण सापडले

ठाणे जिल्ह्यात २३ कोरोनाबाधितांनी गमावला जीव; ४२२ नवे रुग्ण सापडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या ४२२ ने वाढली आहे. तसेच २३ जणांचा मृत्यू झाला. तर जिल्हाभरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९,४८३ च्या घरात पोहोचली असून ३०९ जणांचा मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील मृतांच्या संख्येने शंभरी गाठली असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.


जिल्ह्यात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. बुधवारी या महापालिका हद्दीत १४९ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या तीन हजार ४४९ झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू होऊ न मृतांचा आकडा १०३ झाला आहे. दरम्यान, आज ११६ जण बरे होऊ न घरी परतले आहेत. नवी मुंबईत ९६ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या दोन हजार ४७३ झाली आहे. तर आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नवीन ६२ रुग्ण आढळले. या क्षेत्रातील रुग्णांचा एकूण आकडा एक हजार २२८ झाला आहे. दिवसभरात एकाच्या मृत्यूसह मृतांची संख्या ३४ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ४३ नव्या रुग्णांसह एकूण आकडा ८२० वर पोहोचला आहे. तसेच दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.


बदलापूर येथे नवीन २९ रु ग्ण सापडल्याने एकूण रु ग्णसंख्या २६१ वर पोहोचली आहे. उल्हासनगर येथे नवे १५ रु ग्ण मिळून आल्याने तेथील एकूण रु ग्णसंख्या ४२६ झाली असून तेथे पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १७ झाला आहे. भिवंडी शाहरात १२ नवीन रु ग्ण सापडले. तेथील एकूण रुग्णसंख्या १९७ झाली. तर, १० नवीन रु ग्ण हे ठाणे ग्रामीण येथे सापडल्याने एकूण रु ग्णांचा आकडा ४१५ वर गेला आहे.

अंबरनाथमध्ये सापडले सर्वांत कमी रुग्ण
अंबरनाथमध्ये सर्वांत कमी सहा नवीन रु ग्णांची नोंद झाली. या ठिकाणी रुग्णांची एकूण संख्या २१४ आहे. तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या सात झाल्याची माहिती रु ग्णालय प्रशासनाने दिली.

Web Title: 23 corona victims lose their lives in Thane district; 422 new patients were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.